Join us

धनुष म्हणला, सारा अली खानपेक्षा सोनम कपूर चांगली को-स्टार, बघा काय होतं अभिनेत्रीचं रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:25 IST

धनुष (Dhanush) सोनम कपूर(Sonam Kapoor) ला सारा (Sara Ali Khan)पेक्षा चांगली को-स्टार आणि खूप खास समजतो.

साऊथचा स्टार धनुष (Dhanush)ने आनंद एल राय यांच्या 'रांझणा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सोनम कपूर(Sonam Kapoor) त्याची हिरोईन  होती. आता धनुष आनंद यांच्या 'अतरंगी रे' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) त्याची हिरोईन बनली आहे. पण जेव्हा दोन हिरोईनपैकी सर्वोत्कृष्ट सह-कलाकार कोणता असा प्रश्न धनुषला विचारला जातो. तेव्हा सोनम कपूर असं उत्तर मिळतं.

होय, धनुष सोनम कपूरला सारा पेक्षा चांगली को-स्टार आणि खूप खास समजतो. धनुष आणि सारा नुकतेच 'कॉफी शॉट्स विद करण'मध्ये दिसले. सोनम आणि साराची नावे सांगताना करण जोहरने धनुषला विचारले की, दोघांपैकी कोणासह काम करणं जास्त चांगलं आहे, तेव्हा अभिनेत्याने सोनम कपूरचे नाव घेतले.

याकारणामुळे धनुषसाठी सोनम आहे खास याचे कारणही धनुषने सांगितले. तो म्हणाला, 'अर्थात सारा खूप गोड आहे. 'अतरंगी रे'च्या सेटवर ती खूप धमाल करायची. पण सोनम खूप खास होती. हिंदी चित्रपटात ती माझी पहिली सहकलाकार होती. तिने साऊथमधल्या एका मुलाला खूप कंम्फर्टेबल केलं. तिने माझ्यावर खूप दया केली.  याबद्दल मी तिचा ऋणी राहीन.

साराने असं केलं रिएक्टधनुषचे हे ऐकून सारा म्हणाली की, तिला अजिबात वाईट वाटले नाही. फक्त या गोष्टीची चिंता आहे की ती हॅम्पर गमावते आहे.याच शोमध्ये धनुषने सांगितले की, साराला चित्रपटात साईन केल्याचे कळल्यावर तो थोडा आश्चर्यचकित झाला. सारा या भूमिकेला न्याय देऊ शकेल की नाही याबद्दल त्याला शंका होती. यावेळी धनुषने आनंद एल राय यांनाही सांगितले होते.

टॅग्स :धनुषसारा अली खानसोनम कपूर