Dhanush Mrunal Thakur Dating Rumours : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांच्या कथित अफेअरची. 'सन ऑफ सरदार २' च्या स्क्रीनिंगमध्ये हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले आणि तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याचा संशय नेटकऱ्याना आला होता. मृणालने या अफवा नाकारल्या. पण, चाहत्यांची मात्र खात्री पटली नाही. त्यांच्या अफेअरच्या चर्चा कमी होत नाहीत, तोच धनुष आणि मृणाल यांच्या एका कृतीमुळं त्यांच्या नात्यात नक्कीच काहीतरी शिजतंय, अशी चर्चा सोशल मीडियावर आता जोर धरू लागली आहे.
नुकतंच भन्साळी प्रॉडक्शनने त्यांच्या आगामी 'दो दिवानी सहर मे' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे दोघे मुख्य भूमिकेत असतील. टीझर रिलीज झाल्यावर धनुषने खास मृणालसाठी लिहिलेल्या कमेंटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 'दो दिवाने एक सेहर में' च्या टीझरवर कमेंट करताना धनुषने लिहिलं, "हे पाहायला आणि ऐकायलाही छान आहे".
धनुषच्या या थेट आणि सकारात्मक कमेंटवर मृणाल ठाकूरनेही लगेच प्रतिक्रिया दिली. मृणाल ठाकूरने हार्ट इमोजी आणि सूर्यफूल इमोजीने उत्तर दिले. तर सिद्धांत चतुर्वेदीनेही हात जोडलेला आणि हार्ट इमोजीने रिप्लाय दिला. या दोघांमधील हा संवाद पाहून चाहत्यांनी अंदाज बांधलाय त्यांच्या अफेअरच्या चर्चा केवळ अफवा नसून त्यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे. दरम्यान, धनुष लवकरच 'तेरे इश्क में' या चित्रपटात दिसणार आहे, जो २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
Web Summary : Rumors swirl around Dhanush and Mrunal Thakur's alleged affair after their joint appearance and flirty social media exchange following the release of 'Do Diwani Sehar Mein' teaser. Fans speculate a deeper connection.
Web Summary : 'दो दीवानी सेहर में' के टीज़र के बाद धनुष और मृणाल ठाकुर के कथित अफेयर की अफवाहें उड़ी। सोशल मीडिया पर दोनो की बातचीत से प्रशंसकों ने गहरे संबंध का अनुमान लगाया।