Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवसेना अनुष्का शेट्टी चाहत्यांना आज ६ वाजून ५५ मिनिटांनी देणार स्पेशल गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 23:55 IST

‘बाहुबली-२’मधील देवसेनेला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. त्यामुळेच सर्वांची चाहती देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी आगामी काळात कोणत्या चित्रपटात झळकणार? त्यातील ...

‘बाहुबली-२’मधील देवसेनेला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. त्यामुळेच सर्वांची चाहती देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी आगामी काळात कोणत्या चित्रपटात झळकणार? त्यातील तिचा लूक काय असेल? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळेच आम्ही अनुष्काच्या चाहत्यांची उत्सुकता काहीशी कमी करण्यासाठी तिच्याविषयीची एक बातमी घेऊन आलो आहोत. खरं तर अनुष्काच्या चाहत्यांसाठी ही बातमी नसून एकप्रकारची खूशखबरी आहे. होय, उद्या म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी अनुष्का शेट्टी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करणार असून, याचदिवशी तिच्या आगामी चित्रपटातील तिचा दमदार लूक ती शेअर करणार आहे. होय, युवी क्रिएशन नावाच्या प्रॉडक्शन कंपनीने ट्विटच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिले की, ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी ठीक ६ वाजून ५५ मिनिटांनी अनुष्का शेट्टीच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले जाणार आहे. ज्यामद्ये अनुष्का एका पॉवरफुल अवतारात बघावयास मिळणार आहे. याचा अर्थ एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे वाढदिवशी अनुष्का तिच्या चाहत्यांना एक चांगले गिफ्ट देणार आहे. वृत्तानुसार अनुष्का तिचा वाढदिवस भारतात नव्हे तर दुबईत सेलिब्रेट करणार आहे. यावेळी ती तिच्या क्लोज फ्रेंड प्रभाससोबत असणार आहे. खरं तर अनुष्कानेच सांगितले की, यावेळचा वाढदिवस ती प्रभाससोबत सेलिब्रेट करणार आहे. वास्तविक या दोघांच्या चाहत्यांचीही हिच इच्छा होती. ‘बाहुबली-२’नंतर अनुष्का ‘भागमती’ या चित्रपटात झळकणार आहे. हा तिचा बाहुबलीनंतरचा पहिलाच चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. तिचा हा चित्रपट बिग बजेट असून, इतिहासावर आधारित आहे. चित्रपटात तिच्यासोबत उन्नी मुकुंदन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट तामीळ आणि तेलगू या दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे.