Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तो घमंडी, नखरे करतो, उद्धटपणे बोलतो...", शाहरुखसोबत बोलायला घाबरायचा अभिनेता, सांगितला सिनेमाच्या सेटवरचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:20 IST

शाहरुखशी सेटवर बोलायला देवेन घाबरायचा. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवेन त्याचा हा अनुभव सांगितला. शाहरुखसोबतच्या पहिल्या सिनेमाचा किस्साही त्याने शेअर केला. 

साराभाई वर्सेस साराभाई, बा बहु और बेबी यांसारख्या मालिकामधून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवेन भोजानी. काही बॉलिवूड सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. ये लम्हे जुदाई के, डंकी या सिनेमात तो शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. मात्र शाहरुखशी सेटवर बोलायला देवेन घाबरायचा. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवेन त्याचा हा अनुभव सांगितला. शाहरुखसोबतच्या पहिल्या सिनेमाचा किस्साही त्याने शेअर केला. 

देवेन म्हणाला, "डंकी आधी मी १९९४मध्ये शाहरुखसोबत जादू नावाच्या सिनेमात काम केलं होतं. २००४ मध्ये हा सिनेमा ये लम्हे जुदाई के नावाने प्रदर्शित झाला होता. त्याआधी काही वर्षे मी शाहरुखसोबत एका सिनेमात काम केलं होतं. त्या सिनेमात मी शाहरुखच्या मित्राची भूमिका साकारली होती. पण तो सिनेमा रिलीज झाला की नाही मला माहीत नाही. तेव्हा मी शाहरुखबाबत असं ऐकलं होतं की तो खूप घमंडी आहे आणि नखरे करतो. तो खूप उद्धटपणे बोलतो". 

"सेटवर माझा पहिलाच दिवस होता आणि मी नवीन होतो. मी सगळ्यांशी जाऊन बोललो आणि ओळख सांगितली. पण, शाहरुखसोबत बोलू की नको असा विचार मी करत होतो. कारण मला भीती वाटत होती की शाहरुखने माझा अपमान केला तर... त्यानंतर मी एका कोपऱ्यात बसून माझे डायलॉग बोलत होतो. तेवढ्यात कोणीतरी पाठीमागून आलं. तो शाहरुख खान होता. त्याने स्वत: येऊन माझ्याशी संवाद साधला होता. त्याने स्वत:ची ओळख करून दिली आणि जो जीता वही सिकंदरमधील माझ्या कामाचं कौतुकही केलं. त्यादिवशी त्याच्याबाबत ऐकलेल्या सगळ्या अफवा चुकीच्या ठरल्या", असंही त्याने पुढे सांगितलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Deven Bhojani feared Shah Rukh, recounts film set experience.

Web Summary : Deven Bhojani, known for TV shows, shared he was initially intimidated by Shah Rukh Khan on set due to rumors of arrogance. However, Shah Rukh himself approached Deven, introduced himself, and praised his work, dispelling the rumors.
टॅग्स :शाहरुख खानसेलिब्रिटी