Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देवदास' फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं ८१व्या वर्षी निधन, शाहरुखच्या वडिलांची साकारली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:42 IST

Vijay Crishna Passes Away: बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Vijay Crishna Death: बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. विजय कृष्णा यांचे सहकारी, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी त्यांच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर सांत्वनपर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री लिलेट दुबेने पोस्ट शेअर करत विजय कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलंय की "आमच्या रंगभूमी कुटुंबाचा भाग असलेले आणि २५ वर्षांहून अधिक काळ 'डान्स अ‍ॅक अ मॅन' असलेले आमचे लाडके विजय कृष्ण यांचं निधन झालं आहे. अनेक कलागुणांनी बनलेला एक माणूस, एक हुशार अभिनेता, देखणा, विनोदी. ते आमच्या सर्वांचे खूप लाडके होते. अनेक आठवणी मनाला भिडतात आणि भारावून टाकतात. तुम्हाला कधीही विसरता येणार नाही. त्यांची प्रिय पत्नी स्मिता, मुली न्येरिका आणि फ्रेयान आणि संपूर्ण कुटुंबासाठी प्रेम आणि प्रार्थना". 

विजय कृष्णा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. संजय लीला भन्साळींच्या देवदास या सिनेमात त्यांनी शाहरुख खानचे ऑनस्क्रीन वडील नारायण ही भूमिका साकारली होती. सिनेमातील त्यांची भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. याशिवाय गुजारिश, चैन कुली की मैन कुली, गांधी, ब्लॅक, पीके, फँटम या सिनेमांमध्येही ते महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले.  विजय कृष्णा यांनी काही वर्षे 'गोदरेज' कंपनीच्या व्यवसायांमध्ये कार्यकारी संचालक पद सांभाळलं होतं. मात्र नंतर २०२१ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Devdas' fame actor Vijay Krishna passes away at 81

Web Summary : Veteran actor Vijay Krishna, known for playing Shah Rukh Khan's father in 'Devdas', has died at the age of 81. He also starred in 'Black' and 'PK'. Lillete Dubey expressed her grief on social media. He was an executive director at Godrej.
टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू