Deva OTT Release: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'देवा' (Deva) हा चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिदचा अॅक्शन अवतार बऱ्याच काळानंतर पाहायला मिळाला. शाहिदच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, ते आता ओटीटीवर पाहू शकतील. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर शाहिदचा 'देवा' हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता, याबद्दल जाणून घ्या…
'देवा' आज २८ मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट घरी बसून नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 'देवा'मध्ये शाहिद कपूरने पोलिस अधिकारी देव अंब्रेची भूमिका साकारली आहे. शाहिद कपूरच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. इतकंच नव्हे पूजा हेगडेने (pooja hegade) साकारलेल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. हा सिनेमा 'मुंबई पोलीस' या साउथ सिनेमाचा रिमेक आहे.
'देवा'च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५० कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ५६ कोटींचा व्यवसाय केलाय. हा चित्रपट भारतात फक्त ३३.५४ कोटी रुपये कमवू शकला. याआधी शाहिद 'तेरी बातें में ऐसा उलझा जिया' मध्ये दिसला होता. तर आता तो लवकरच 'फर्जी २' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजा पहिला सीझन ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.