निर्मिती क्षेत्रात कपिल आजमावणार नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:39 IST
वि नोदवीर ते अभिनेता असा प्रवास करणारा कपिल शर्मा बॉलिवुडमध्ये येताच बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. त्याचा पहिला चित्रपट ...
निर्मिती क्षेत्रात कपिल आजमावणार नशीब
वि नोदवीर ते अभिनेता असा प्रवास करणारा कपिल शर्मा बॉलिवुडमध्ये येताच बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. त्याचा पहिला चित्रपट 'किस किसको प्यार करूं' ला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अशातच त्याने ट्विट केले आहे की निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावण्याची तो तयार असून त्याची प्रोडक्शन कंपनी '१३ ऑगस्ट १९४७' या नावाचा चित्रपट लवकरच बनवणार आहे. याबाबत कपिल म्हणाला ' किस किसको..' हिट झाल्यामुळे माझ्यासाठी आता सगळे दरवाजे उघडले गेले आहेत. त्यामुळे मी आता आव्हानात्मक भूमिका साकारू इच्छितो. या यशामुळे माझ्यावरच्या जबाबदार्या वाढल्या आहेत. काही बड्या निर्मात्यांनीही माझ्याशी चर्चा केली आहे. माझी लेखकांची टीम सध्या या विषयावर काम करत आहे परंतु डोक्यात सतत वेगवेगळ्या आयडीया येत असल्यामुळे अजुन काहीही फायनल झाले नाही.'