Join us

मुंबईत अमिताभ बच्चन यांनी घेतली आणखी एक 12000 स्क्वेअर फुटांची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:05 IST

अमिताभ बच्चन यांनी गतवर्षी अभिनेत्री क्रिती सेनॉनला डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने दिली होती. याचे ते एका महिन्याचे 10 लाख रुपये भाडे घेत आहेत.

एकेकाळी बिग बी अमिताभ बच्चन यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावलेली होती. कौन बनेगा करोडपती आले आणि त्यांना बळ मिळाले. आज अमिताभ बच्चन यांचे मुंबईत सहा बंगले आहेत. परंतू आता त्यांनी एका गगनचुंबी इमारतीमध्ये 12000 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला आहे. 

पार्थेनॉन सोसायटीच्या 31 व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे. या खरेदीशी संबंधीत व्यक्तीने सांगितले की, अमिताभ इथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी ही मालमत्ता खरेदी केली आहे. असे असले तरी पार्थेनॉनमध्ये राहणारे लोक या खरेदीने नाराज झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आधीच 6 बंगले आहेत. 10 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या पहिल्या 'जलसा'मध्ये ते कुटुंबासह राहतात. दुसरा बंगला 'प्रतीक्षा' आहे, जिथे ते 'जलसा'मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी आई-वडिलांसोबत राहत होते. तिसरा बंगला 'जनक' आहे, जिथे त्यांचे कार्यालय आहे आणि चौथा बंगला 'वत्स' आहे. 2013 मध्येही त्यांनी 'जलसा'च्या मागे 60 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. सहावी मालमत्ता त्यांनी गेल्या वर्षीच खरेदी केली होती. 

अमिताभ बच्चन यांनी गतवर्षी अभिनेत्री क्रिती सेनॉनला डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने दिली होती. याचे ते एका महिन्याचे 10 लाख रुपये भाडे घेत आहेत. हे घर क्रितीने 2 वर्षांच्या करारावर घेतले आहे. लोखंडवाला रोडवरील अटलांटिस इमारतीच्या २७व्या आणि २८व्या मजल्यावर हा डुप्लेक्स आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चन