Join us

दीपिकाला रिप्लेस करूनही तृप्ती डिमरी तिच्या सपोर्टमध्ये; 'स्पिरिट' वादातील निगेटिव्ह पीआरवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:26 IST

अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिने दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ला चित्रपट 'स्पिरिट'(Spirit Movie)मध्ये रिप्लेस केले आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिने दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ला चित्रपट 'स्पिरिट'(Spirit Movie)मध्ये रिप्लेस केले आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Wanga) 'स्पिरिट' चित्रपट बनवत आहेत. संदीप आणि दीपिका यांच्यात मतभेदाच्या बातम्या आल्या होत्या. दीपिका फी वाढवून मागत होती, तसेच ७ तासांच्या शिफ्टची मागणी करत होती, अशा चर्चा होत्या. यानंतर दीपिकाला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि तृप्तीला कास्ट करण्यात आले. तृप्तीच्या कास्टिंगची अधिकृत घोषणाही संदीप रेड्डी वांगा यांनी केली. आता तृप्ती डिमरीदीपिका पादुकोणच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. तिने एका सोशल मीडिया पोस्टला लाईक केले आहे, ज्यात दीपिकाविरोधातील निगेटिव्ह पीआर आणि खोट्या धारणांबद्दल लिहिले होते.

व्हिडीओमध्ये सेलिब्रिटी साडी ड्रेपर डॉली जैन सांगत आहेत की, दीपिकाने 'गोलियों की रासलीला राम लीला' चित्रपटातील 'नगाडा संग ढोल बाजे' गाण्यावर अनवाणी कसे नृत्य केले होते. त्यावेळी तिचे पाय रक्तबंबाळ झाले होते, पाय सुजले होते, कारण तिने ३० किलोचा जड लेहेंगा घातला होता आणि कोरिओग्राफीही खूप दमदार होती. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिले की, "दीपिका पादुकोण कधीही 'अनप्रोफेशनल' असू शकत नाही, जसे लोक तिला बनवण्याचा प्रयत्न करत आहेत."

'कल्की २' मधूनही काढले होते बाहेरयाशिवाय, दीपिका पादुकोणला नुकतेच साउथच्या दोन चित्रपटांमधून काढण्यात आले आहे. 'स्पिरिट' नंतर तिला चित्रपट 'कल्की २' मधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 'कल्की'च्या पहिल्या भागात दीपिका पादुकोण दिसली होती. पण आता ती दुसऱ्या भागाचा भाग नाही. खुद्द निर्मात्यांनीच याची घोषणा केली होती. निर्मात्यांनी लिहिले होते, "दीपिका पादुकोण आता 'कल्की 2898 एडी' च्या दुसऱ्या भागाचा भाग नाही. आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. पहिल्या चित्रपटाच्या लांब प्रवासानंतर आता तिच्यासोबत आमची भागीदारी होऊ शकत नाहीये. 'कल्कि' सारखा चित्रपट कमिटमेंट मागतो. आम्ही दीपिकाच्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो."

English
हिंदी सारांश
Web Title : Tripti Dimri supports Deepika after replacing her in 'Spirit'.

Web Summary : Tripti Dimri, cast in 'Spirit' after Deepika Padukone's exit, defended Deepika against negative PR. Dimri liked a post highlighting Deepika's professionalism, referencing her dedication during 'Ram Leela'. Deepika was also reportedly dropped from 'Kalki 2' due to commitment differences.
टॅग्स :दीपिका पादुकोणतृप्ती डिमरी