Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद अली-अमिताभ यांच्या चित्रपटाची इच्छा अधुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 16:52 IST

मोहम्मद अली आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र घेऊन चित्रपट काढण्याची प्रकाश मेहरा यांची इच्छा अधुरी राहिल्याचे अमिताभ बच्चन यांनी ...

मोहम्मद अली आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र घेऊन चित्रपट काढण्याची प्रकाश मेहरा यांची इच्छा अधुरी राहिल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. बॉक्सर मोहम्मद अली ‘सर्वात महान’ होते, असेही बच्चन यांनी म्हटले आहे. }}}}२ जून रोजी अली यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले होते. बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात महान बॉक्सर म्हणून त्यांची ओळख होती. १९८१ साली ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना दुर्धर आजाराने गाठले. वयाच्या १२ व्या वर्षापासून त्यांनी बॉक्सिंगला सुरुवात केली. वयाच्या २२ वर्षी म्हणजे १९६४ साली त्यांनी विश्व हेविवेट चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. १९७४ साणि १९७८ साली त्यांनी पुन्हा विश्वविजेतेपद मिळविले.