‘देसीगर्ल’चं इरफाननं का केलं तोंडभरुन कौतुक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 11:07 IST
देसीगर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच फॉर्मात आहे.. बॉलीवुडपासून हॉलीवुडपर्यंत सगळेच तिच्यावर आणि तिच्या कामावर फिदा आहेत. आता बॉलीवुडचा अभिनेता ...
‘देसीगर्ल’चं इरफाननं का केलं तोंडभरुन कौतुक ?
देसीगर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच फॉर्मात आहे.. बॉलीवुडपासून हॉलीवुडपर्यंत सगळेच तिच्यावर आणि तिच्या कामावर फिदा आहेत. आता बॉलीवुडचा अभिनेता इरफान खान यानंही पिग्गी चॉप्सच्या यशाचं तोंडभरुन कौतुक केलंय. प्रियंकाला मिळत असलेल्या यशाला ती पात्र असल्याचं इरफाननं म्हटलंय. इतक्या कमी वेळात प्रियंकानं बरीच मेहनत घेत हे यश संपादन केलंय. त्यामुळं सध्या तिला मिळत असलेली ओळख आणि यशासाठी ती पात्रच असल्याचं इरफाननं म्हटलं. हॉलीवुडमध्ये तिनं मिळवलेलं यश, ओळख मिळवणं ही साधीसुधी गोष्ट नसल्याचंही त्यानं सांगितलंय.