Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही...", हाय कोर्टाने हनी सिंह अन् बादशहाला धारेवर धरलं, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:01 IST

२० वर्ष जुन्या गाण्यामुळे प्रकरण अंगाशी आलं, हाय कोर्टाने हनी सिंह अन् बादशहाला फटकारलं, ते गाणं काढून टाकण्याचे आदेश 

Honey Singh And Badshah Song Controversy: भारतात हिप-हॉप म्युझिक, रॅपची नाव घेताच, सर्वप्रथम  हनी सिंह आणि बादशहा ही नावे आपल्या ओठांवर येतात. आजवर अनेक गाजलेली गाणी त्यांनी गायली आहेत. मात्र, सध्या हे दोघे एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. दिल्ली हायकोर्टाने काल गुरुवारी रॅपर हनी सिंह आणि बादशाह यांच्या एका जुन्या गाण्यावरून त्यांना फटकारलं आहे. न्यायालयाने त्यांचे २००० च्या दशकातील जुनं वादग्रस्त गाणं 'माफिया मुंडीर' वॉल्यूम 1 इंटरनेटवरील सर्व प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाने या गाण्याचे बोल 'अत्यंत अश्लील' आणि महिलांप्रती अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, अलिकडेल एका कॉन्सर्टमध्ये हनी सिंगनं गाण्याच्या काही ओळी गायल्या होत्या. त्यामुळे या वादाला तोंड फुटलं.ज्यामुळे हे गाणं त्याचंच असल्याचं सिद्ध झालं.त्यानंतर हे गाणं युट्यूब, गूगल आणि स्पॉटिफाय यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात यावं अशी याचिका हिंदू शक्ती दलानं दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती पुष्पेंद्र कुमार यांनी केंद्र सरकार, सोशल मीडिया कंपन्या आणि संगीत प्लॅटफॉर्मना ते गाणे तात्काळ ब्लॉक करण्याचे आणि ते कोणत्याही स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध होणार नाही याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीउच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी 

सुनावणीपूर्वी न्यायमूर्ती पुरुषेंद्र कौरव यांनी गाणं ऐकल्यानंतर आणि त्याचे बोल वाचल्यानंतर म्हटलं, न्यायालयाच्या सद्सद्विवेकबुद्धीला खोलवर धक्का देणाऱ्या अत्यंत दुर्मिळ प्रकरणांपैकी हे एक आहे.कारण या गाण्याचे बोल महिलांप्रति अपमानकारक आहेत. कोणत्याही सुसंस्कृत समाजात डिजिटल माध्यमांवर अशा प्रकारच्या गाण्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.यात कोणतेही कलात्मक किंवा सामाजिक मूल्य नाही.कलात्मक अभिव्यक्तीच्या नावाखाली अशी अश्लीलता सहन केली जाणार नाही.असं न्यायालयाने सांगितलं.

दिल्ली उच्च न्यायालयाने फक्त हे गाणे हटवण्याचे आदेश दिले नाहीतर हनी सिंग आणि बादशहा या दोघांनाही चांगलंच फटकारलं आहे. महिलांप्रति इतका अपमानकारक मजकूर प्रसारित करणं हे गंभीर असल्याचं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.  आता या प्रकरणी पुढील सुनावणी आता ७ मे रोजी होणार आहे.

'व्हॉल्यूम १' हे गाणं जवळपास दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. त्यावेळी ते गाणे बरेच लोकप्रिय झाले, पण दुसरीकडे या गाण्यामुळे मोठा वादही निर्माण झाला. अनेक ठिकाणी या गाण्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Court slams Honey Singh, Badshah for vulgar song, orders removal.

Web Summary : Delhi High Court reprimanded Honey Singh and Badshah, ordering the removal of their song 'Mafia Mundeer' due to its vulgar and offensive lyrics against women. The court emphasized that such obscenity cannot be tolerated under the guise of art.
टॅग्स :हनी सिंहबादशहाबॉलिवूडसेलिब्रिटीउच्च न्यायालयदिल्ली