डिप्पी चिल्स आऊट इन टोरँटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 10:47 IST
दीपिका पदुकोन ही प्रत्येकाला तिचा चार्म, टॅलेंट यांच्यामुळे प्रभावित करत असते. दीपिका पदुकोन ही बाजीराव मस्तानीनंतर बॉलीवूडमध्ये दिसली नाही. ...
डिप्पी चिल्स आऊट इन टोरँटो
दीपिका पदुकोन ही प्रत्येकाला तिचा चार्म, टॅलेंट यांच्यामुळे प्रभावित करत असते. दीपिका पदुकोन ही बाजीराव मस्तानीनंतर बॉलीवूडमध्ये दिसली नाही. तेव्हापासून ती टोरँटोत तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ च्या शूटिंगमध्ये बिझी झाली.सध्याही ती हॉलीवूडमधील हॉट अभिनेता विन डिजेलसोबत अमेरिकेत शूटिंग करत आहे. ती नुकतीच तिची इंटेरिअर डिझायनर फ्रेंड सोबत टोरँटोत भेटली होती. क्युपा कॉफी पिताना दोघी एकमेकींसोबत मस्तपैकी चॅटिंग करत होत्या.ती आत्तापर्यंत मिआमी आणि लॉस एंजलिस येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली होती. दीपिकाची को-स्टार निना डोब्रेव्ह हिने चित्रपटाची शूटिंग दोन दिवसांपूर्वीच संपवली आहे.दीपिका मे महिन्याच्या शेवटी चित्रपटाची शूटिंग पूर्ण क रणार आहे. त्यानंतर ती संजय लीला भन्साळी आणि शूजित सरकार यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात परतणार आहे.