Join us

​दीपिकाच्या हॉलिवूडपटाचा टीजर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 21:46 IST

दीपिका पदुकोणच्या हॉलिवूडपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. तूर्तास तरी दीपिकाच्या बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे

दीपिका पदुकोणच्या हॉलिवूडपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. तूर्तास तरी दीपिकाच्या बहुचर्चित   XXX: The Return of Xander Cage या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये दीपिकाचा जबरदस्त आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. दीपिकाने आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचं टीझर पोस्ट केल आहे.  हे टीझर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. दीपिकाचा या टीझरमधील अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला पडला आहे. दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे. टीझरमधील दीपिकाच्या अभिनयाने चाहत्यांची उत्सुकता अजून वाढवली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.