Join us

​‘ xXx’ चा ट्रेलर पाहून दीपिकाचे चाहते नाराज..पण डोन्ट वरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 20:59 IST

दीपिकाचा पहिला वहिला हॉलिवूडपट ‘xXx: The Return of Xander Cage’ येतोय. तेव्हा तिचे तमाम चाहते उत्सूक असणारच. या चित्रपटाचा टीजर ट्रेलर आज रिलीज झाला. खरेतरं या टीजर ट्रेलरमध्ये दीपिकाला पाहण्यास तिचे तमाम भारतीय चाहते अतिशय उत्सूक होते. पण हे काय, या टीजर ट्रेलरमध्ये विन डिजेलच्या स्टंटशिवाय फारसे काहीच दिसत नाही. ही गोष्ट दीपिकाच्या चाहत्यांना हर्ट करणारच..

दीपिकाचा पहिला वहिला हॉलिवूडपट ‘xXx: The Return of Xander Cage’ येतोय. तेव्हा तिचे तमाम चाहते उत्सूक असणारच. या चित्रपटाचा टीजर ट्रेलर आज रिलीज झाला. खरेतरं या टीजर ट्रेलरमध्ये दीपिकाला पाहण्यास तिचे तमाम भारतीय चाहते अतिशय उत्सूक होते. पण हे काय, या  टीजर ट्रेलरमध्ये विन डिजेलच्या स्टंटशिवाय फारसे काहीच दिसत नाही.  जंगलात स्कीर्इंग, लाटांवर बाईक राईडिंग असे काय काय (आपल्यासाठी सो स्टुपिड ना???) विन यात करताना दिसतोय आणि आपली दीपिकाचे यात पुरती हरवलीय. तिचे दर्शन घडते ते अगदी काही सेकंद. हे पाहून दीपिकाला या ट्रेलरमध्ये अगदी गौण स्थान दिले गेले आहे, असे कुण्याही भारतीयाला वाटणे स्वाभाविक आहे. तिचा ना एक डॉयलॉग, ना एक किक...ही गोष्ट दीपिकाच्या चाहत्यांना हर्ट करणारच..पण थांबा...दीपिकाला ट्रेलरमध्ये फार महत्त्व दिलेले नाही, हे खरं. पण कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी आपण त्याची कारणेही शोधायलाच हवी. सर्वात  महत्त्वाचे म्हणजे दीपिकाच्या या हॉलिवूडपटाचे नाव ‘ xXx: The Return of Xander Cage’ असे आहे.‘xXx: The Videshi Debut of Deepika Padukone’ असे नाही. म्हणजेच विन हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. दीपिका नाही. दुसरे म्हणजे तुम्हाला हे वाचायला वा ऐकायला आवडो वा ना आवडो, पण दीपिका अमेरिकन प्रेक्षकांमध्ये फारसे परिचित नाव नाही. म्हणजेच तिथच्या लोकल स्टार्सच्या तुलनेत दीपिकाचे पारडे हलकेच आहे. तिसरे म्हणजे आज जारी झाला तो केवळ टीजर ट्रेलर आहे.  त्यामुळे यात लीड रोलमधील स्टारवर फोकस करणे स्वाभाविक गोष्ट आहे आणि चौथी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दीपिकाच नव्हे तर मोठ्या हॉलिवूड चित्रपटांत झळकलेल्या अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या हॉलिवूडपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये अगदी काही सेकंदापुरतेच झळकल्याचीच उदाहरणे आहेत.नरगीस फखरी : स्पाय‘स्पाय’ या हॉलिवूडपटात नरगीस दिसली होती. पण या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये दिसल्या न दिसल्यासारखी झळकली होती. अर्थात दुसºया ट्रेलरमध्ये पहिल्यापेक्षा अधिकवेळ दिसली होती. पण नो डायलॉग्स, नो अ‍ॅक्शन...अनिल कपूर : मिशन इम्पॉसिबल 4-घोस्ट प्रोटोकॉल‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा अनिल कपूर यांना हॉलिवूडमध्ये मिळालेला मोठा ब्रेक होता. पण अनिल यांचा खरा हॉलिवूड ब्लॉकबस्टर डेब्यू होता ‘ मिशन इम्पॉसिबल 4-घोस्ट प्रोटोकॉल. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनिल कपूर यांचे केवळ एका सेकंदासाठी दर्शन घडले होते. ऐश्वर्या रॉय : दी पिंक पँथर2 ‘पिंक पँथर’चे अपार यश पाहता ‘दी पिंक पँथर2’या दुसºया सीरिजमध्ये ऐश्वर्या रॉयला संधी मिळाली, याची सर्वाधिक चर्चा झाली होती. मात्र या चित्रपटाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही निराश केली होती. साहजिकच या अपयशामुळे ऐशच्या हॉलिवूडमधील स्वप्नांनाही ब्रेक लागला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्या केवळ ३ सेकंद झळकली होती.इरफान खानइरफान खानची हॉलिवूडमधील वाटचाल सातत्यपूर्ण राहिली. ‘दी अमेझिंग स्पायडर मॅन २’, लाईफ आॅफ पाय, ज्युरासिक वर्ल्ड शिवाय आगामी ‘इनफर्नो’ अशा अनेक दमदार हॉलिवूडपटात इरफान दिसला. इरफानचा हॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक होता तो अ‍ॅन्जेलिना जोलीचा ‘अ माइटी हर्ट’. यात इरफानने पाकिस्तानी पोलिस अधिकाºयाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. कदाचित केवळ महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो ९ सेकंद दिसला होता.अमिताभ : दी ग्रेट गेट्सबे‘दी ग्रेट गेट्सबे’ या चित्रपटात अमिताभ यांचा केवळ एक सीन होता. मात्र तरिही या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमिताभ यांना ८ सेकंदाचा वेळ मिळाला होता. याचे कारण म्हणजे अमिताभचे कॅरेक्टर हे नॉवेलमधील महत्त्वपूर्ण कॅरेक्टर होते. चित्रपटातील त्यांच्या पात्राचे महत्त्व जोखून कदाचित त्यांना ट्रेलरमध्ये अधिक फुटेज देण्यात आले.