भरस्टेजवर दीपिकाचे खोटे पत्रवाचन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 09:54 IST
त्तम अभिनयाचा खरा परिचय तिने पडद्यावर नाही तर लाईव्ह स्टेजवर दिला.
भरस्टेजवर दीपिकाचे खोटे पत्रवाचन?
दीपिका पदुकोन तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ओळखली जाते. पण उत्तम अभिनयाचा खरा परिचय तिने पडद्यावर नाही तर लाईव्ह स्टेजवर दिला.तुम्हाला आठवत असेल की, काही महिन्यांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने ‘पिकू’साठी बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार स्वीकारताना वडिलांनी तिला लिहिलेले इमोशनल पत्र वाचून दाखविले होते. वाचताना तिच्या डोळ्यांत पाणी होते, आवाज कातरत होता.मुलीच्या कतृत्वाचे एक बाप कौतुक करतो अशा आशयाचे ते पत्र होते. उपस्थित सर्वजण यामुळे भारावून गेले होते. परंतु आता असे कळतयं की, ते पत्र दीपिकाचे वडिल प्रकाश यांनी नाही तर एका पुस्तकाच्या लेखिकेने लिहिलेले आहे.सुधा मेनन यांच्या ‘लेगसी : लेटर्स फ्रॉम एमिनंट पॅरेन्ट्स टू देअर डॉटर’ या पत्रसंग्रहातील ते दीपिकाच्या नावाने पत्र आहे. आता दीपिकाच्या भावनांवर आम्हाला काही शंका नाही. पण स्टेजवर तिने मुळ लेखिकाचा उल्लेख करणे अपेक्षित होते. नाही का? Video Courtesy: Sony Entertainment Television