Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाच्या गडाला खिंडार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 21:18 IST

कंगना राणौत सध्या एका गोष्टीचा ढोल बडवताना दिसतेय.  संजय लीला भन्साळी एक पीरियड सिनेमा बनवू इच्छितात आणि त्यात त्यांना ...

कंगना राणौत सध्या एका गोष्टीचा ढोल बडवताना दिसतेय.  संजय लीला भन्साळी एक पीरियड सिनेमा बनवू इच्छितात आणि त्यात त्यांना मी हवी आहे, असे कंगना सांगत सुटली आहे. याबद्दलचे एक निवेदनही तिने जाहिर केले. संजय सरांनी माझ्याशी चर्चा केलीय. त्यांना एक पीरियड ड्रामा बनवायचा आहे, असे या निवेदनात कंगनाने म्हटले आहे. अर्थात यापुढची कुठलीही माहिती देण्यास कंगना तयार नाही. सध्या यापेक्षा अधिक काही सांगणे घाईचे ठरेल, असे ती म्हणतेय. आता जर चर्चा पाईपलाईनमध्ये आहे तर कंगना इतके ढोल का बडवतेयं? यामागे कुणाला इशारा देण्याचा तर कंगनाचा इरादा नाही ना?? सध्या बॉलिवूडमध्ये याचीच खमंग चर्चा सुरु आहे. होय, कंगनाचा इशारा दुसऱ्या-तिसऱ्या कुणासाठी नसून दीपिका पादुकोणसाठी आहे, असे मानले जातेय. दीपिकाने भन्साळींसोबत ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ सारखे  सुपरहिट चित्रपट केले. भन्साळींच्याच आगामी  ‘पद्मावती’ या सिनेमातही दीपिकाचीच वर्णी लागली आहे. एकंदर काय, तर दीपिका भन्साळींच्या गुडबुकमध्ये आहे. भन्साळी कुठलाही सिनेमा करोत, ते आपल्यालाच घेणार, यावर जणू दीपिकाचा विश्वास बसला आहे. कंगनाला कदाचित दीपिकाच्या याच विश्वासाला तडा द्यायचा आहे. दीपिकाने हॉलिवूडचा रस्ता धरल्यापासून कंगनाने तिच्या गडाला खिंडार पाडणे सुरु केले होते आणि कदाचित कंगना यात बºयापैकी यशस्वीही झाली.  आता पुढे पुढे काय होते, ते बघूच!!