Join us  

दीपिकाला व्हायचंय निर्माती !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:11 AM

अभिनेत्री दीपिका पदुकोन म्हणते की, 'आता मला भविष्यात निर्माती बनून सगळं सांभाळायला आवडेल. ' नुकताच दीपिकाचा तमाशा हा चित्रपट ...

अभिनेत्री दीपिका पदुकोन म्हणते की, 'आता मला भविष्यात निर्माती बनून सगळं सांभाळायला आवडेल. ' नुकताच दीपिकाचा तमाशा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारसा काही परिणाम दाखवू शकला नाही. त्यामुळे ती म्हणते,' मी माझे नशीब आता प्रोडक्शनमध्ये आजमावू इच्छिते. माझ्याकडे तसे व्यक्तिमत्त्व आहे. मला गोष्टी एकत्र आणायला आणि सर्व एकत्र घडवायला आवडते.मला तांत्रिक बाबींविषयी फार काही माहिती नाही. पण निर्माता ज्याप्रमाणे सर्व गोष्टी एकत्र आणतो त्याचप्रमाणे मलाही काही चित्रपट तयार करून पाहायचे आहेत. प्रेक्षक ांना आवडतील याप्रमाणे चित्रपट मला बनवायचे आहेत. माझ्या चित्रपटात मी अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी कुंद्रा, दिया मिर्झा, लारा दत्ता यांना घेऊ इच्छिते.