Join us

​दीपिका फिट राहण्यासाठी घेतेय मेहनत !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 13:14 IST

बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये आपले करिअर अबाधित ठेवण्यासाठी फिट असणे गरजेचे आहे

बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये आपले करिअर अबाधित ठेवण्यासाठी फिट असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रेटी मेहनत घेत असतात. त्यातच हॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या बॉलिवूडची हॉट स्टार दीपिका पादुकोण कशी लांब राहणार. दीपिका फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेत असून  एक्सर्साइज करतांनाचा तिचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.दीपिकाने तिचा आगामी सिनेमा 'ट्रिपल एक्स: रिर्टन आॅफ जैन्डर केज' ची  शूटिंग पूर्ण केली. डी. जे. कारुसो दिग्दर्शित हा सिनेमा 2002 मध्ये आलेल्या 'xXx आणि 2005 मधील xXx:स्टेट आॅफ द यूनियन या सिनेमाचा सिक्वेल आहे. हा सिनेमा 20 जानेवारी 2017 ला रिलीज होणार आहे.