Join us

दीपिका पादुकोणचे सेल्फ मॅगझीन फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:18 IST

दीपिका पादुकोण हिचा आगामी हॉलिवूड ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या डिप्पी ...

दीपिका पादुकोण हिचा आगामी हॉलिवूड ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या डिप्पी तिचा संपूर्ण वेळ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खर्च करत आहे. पुढील महिन्यापासून जोरदार प्रमोशन सुरू होणार असल्याने दीपिका आता काही दिवस न्यू ईअरच्या स्वागतासाठी सिक्रेट व्हॅकेशन्सवर जाणार आहे. दरम्यान, दीपिकाने जानेवारीमध्ये प्रकाशित होणाऱ्या  ‘सेल्फ मॅगझीन’साठीचे फोटोशूट केले. या फोटोत तिचे फिटनेसवरील प्रेम दिसून येतेय. तिने हाच फोटो सोशल मीडियावरही शेअर केला असून त्याला ‘सेल्फ मॅगझीन जानेवारी..फेब्रुवारी’ असे कॅप्शन दिले आहे. दीपिका सध्या ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. यात शाहिद कपूर, रणवीर सिंग यांच्यासह मुख्य भूमिकेत दीपिका पादुकोण दिसेल. संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून चित्रपटाचे पहिले शेड्यूल नुकतेच संपले आहे.