Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल लूक’ तुम्हाला करून देईल परिकथांची आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 11:32 IST

दीपिका पादुकोणने अलीकडे एक फोटोशूट केले. या फोटोशूटमधील फोटो पाहून एखाद्या परीकथेतील परी धरतीवर अतवरल्याचा भास तुम्हाला होईल. या ...

दीपिका पादुकोणने अलीकडे एक फोटोशूट केले. या फोटोशूटमधील फोटो पाहून एखाद्या परीकथेतील परी धरतीवर अतवरल्याचा भास तुम्हाला होईल. या फोटोशूटमध्ये दीपिका वेगवेगळ्या रॉयल लूकमध्ये दिसतेय. तिला पाहून रेड राईडिंग हूडपासून तर सिंड्रेलापर्यंतच्या अनेक प्रिन्सेस तुम्हाला आठवतील. एका ज्वेलरी ब्रांडसाठी दीपिकाने हे फोटोशूट केले आहे. यापूर्वी याच ब्रँण्डसाठी दीपिकाने आई उज्ज्वला व वडिल प्रकाश यांच्यासोबत फोटोशूट केले होते.सध्या दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दीपिकाने हे रॉयल फोटोशूट केले आहे. काही दिवसांपासून एका मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले होते. तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे भन्साळी नाराज झाल्याचे वृत्तही आले होते. पूर्वानुभव बघता भन्साळींना आता ‘पद्मावती’बद्दल कुठलाही वाद नकोय. त्यामुळेच त्यांना दीपिकाचे हे बोल्ड फोटोशूट खटकल्याचे वृत्त आले होते.  तूर्तास दीपिका ‘पद्मावती’शी जुळलेली आहे. तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात. वाद उद्भवू शकतो, असे भन्साळींना वाटले होते. कदाचित यापासून दीपिकाने धडा घेतलाय. होय, कारण या ताज्या फोटोशूटमध्ये दीपिकाने एकदम रॉयल लूक निवडला आहे.ALSO READ : ​डिप्पी ‘जरा जपून’!! दीपिका पादुकोणच्या बोल्ड फोटोशूटवर भन्साळी नाराज!अलीकडे दीपिकाचा ‘७७७ : द रिटर्न आॅफ झेंडर केज’ हा हॉलिवूडपट रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या चौथ्या सीरिजमध्येही दीपिकाची वर्णी लागली आहे. यात ती सेरेना उंगेरचीच भूमिका साकारणार आहे. याशिवाय दीपिकाने विशाल भारद्वाज यांचा एक चित्रपट साईन केल्याचीही खबर आहे. हनी त्रेहान हा चित्रपट दिग्दर्शित करणार असल्याचे कळते. यात दीपिका तिचा ‘पिकू’ को स्टार इरफान खानसोबत दिसेल. यात ती गँगस्टर क्विन सपना दीदीची भूमिका साकारणार असल्याचे समजते.