Join us

आमिर खानच्या 'महाभारता'त दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदीची भूमिका ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 11:27 IST

आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिर खानने पहिल्यांदाच त्याचा ड्रिम ...

आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिर खानने पहिल्यांदाच त्याचा ड्रिम प्रोजेक्ट 'महाभारत'ची स्टार कास्टचा शोध सुरु केला आहे. हंगामाच्या रिपोर्टनुसार आमिरला महाभारतात द्रौपदीच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला बघायची इच्छा आहे. दीपिका पादुकोणकडे द्रौपदीच्या भूमिकेसाठी नैसर्गिक आवाज आहे. तिच्याकडे उत्साह आणि ग्रेससुद्धा आहे. मात्र पद्मावतनंतर दीपिका अशी कोणतिही पौराणिक भूमिका साकारायची नाही ज्यामुळे ती वादात अडकले. सूत्रांच्या माहितीनुसार आमिर खानने आपल्या जवळशा मित्राशी बोलताना म्हटले आहे की, द्रौपदीची भूमिका दीपिका पादुकोणशिवाय आणखीन कोणी साकारु शकत नाही. जर सगळे ठिक झाले तर दीपिका पादुकोणने या भूमिकेसाठी होकार दिला तर पहिल्यांदा आमिर आणि दीपिका एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील. चित्रपटाच्या निर्मिती जबाबदारी मुकेश अंबानी यांनी साकारली आहे. चित्रपटाचा बजेट जवळपास 1000 कोटींचा आहे. आमिरचा हा ड्रिम प्रोजेक्ट सहा ते सात भागांत असेल, असेही समजतेयं. शिवाय तो यात अभिनयही करणार असल्याची माहिती आहे.  चर्चा खरी मानाल तर आमिर व त्याच्या लेखकांच्या टीमने याची तयारीही सुरु केली आहे. पुण्याच्या लायब्ररीत असतील नसतील तितक्या महाभारतावरील  पुस्तकांचा आमिर व त्याची टीम फडशा पाडला आहे. एकंदर काय तर चित्रपटावरचे काम सुरु झाले आहे. पण खरी अडचण यानंतरची आहे. ‘महाभारतावर चित्रपट हे माझे स्वप्न आहे. पण यासाठी मला माझ्या आयुष्याची 15 ते 20 वर्षे द्यावी लागतील, हे मी जाणतो आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट हाती घेण्यास घाबरतोयं,’ असे अलीकडे आमिर म्हणाला होता. आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदोस्तान हा  2018च्या दिवाळीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज बॅनर खाली तयार होणाऱ्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.ALSO READ :  आमिर खानच्या ‘कृष्ण’ साकारण्यावरून वाद! एका ट्वीटने सुरु झाले ‘महाभारत’!!