रोजच्या धमक्यांमुळे रणवीर सिंग बनला गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणचा बॉडीगार्ड, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 21:04 IST
गेल्या शुक्रवारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना दिग्दर्शक जोया अख्तर यांच्या घराबाहेर बघण्यात आले. यावेळी रणवीर ...
रोजच्या धमक्यांमुळे रणवीर सिंग बनला गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणचा बॉडीगार्ड, पहा फोटो!
गेल्या शुक्रवारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांना दिग्दर्शक जोया अख्तर यांच्या घराबाहेर बघण्यात आले. यावेळी रणवीर गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणचे बॉडीगार्डप्रमाणे संरक्षण करताना बघावयास मिळाला. विशेष म्हणजे पोलिसांचा एवढा बंदोबस्त असतानाही रणवीर स्वत: दीपिकाला कारपर्यंत सोडविण्यासाठी गेला. रिपोर्ट्सनुसार ‘पद्मावती’ प्रकरणात दीपिकाला नाक कापण्याची धमकी देण्यात आल्यानंतर तिच्या सुरक्षा व्यवस्थेत कमालीची वाढ करण्यात आली. शिवाय त्यादिवसापासून रणवीरही दीपिकाचा बॉडीगार्ड बनला असून, तो तिच्या रक्षणाकरिता कुठलीच कसर सोडू इच्छित नाही. कदाचित याच कारणामुळे जोया अख्तरच्या घराबाहेर त्याने दीपिकाला कारपर्यंत एकटे जाऊ दिले नाही. दुसरीकडे मुंबई पोलिसांवर दीपिकाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दीपिका घराबाहेर कुठेही जात असल्यास पोलिसांचा खडा पहारा तिच्या अवतीभोवती असतो. प्रत्येक ठिकाणी पोलीस तिला फॉलो करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच जेव्हा दीपिका जिमसाठी घराबाहेर पडली तेव्हा तिच्यासोबत दोन पोलीस बघावयास मिळाले. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, दीपिकाच्या सुरक्षा व्यवस्थेत किती मोठी वाढ करण्यात आली आहे. सूत्रानुसार, जेव्हा दीपिका जिममध्ये वर्कआउट करीत होती, तेव्हादेखील दोन पोलीसवाले तिच्याकडे लक्ष ठेवून होते. कारण काही राजकारण्यांकडून तिला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने पोलीस तिच्या संरक्षणात कुठलीच कसर सोडू इच्छित नाही. दरम्यान, राजपूत करणी सेनेकडून दीपिकाला नाक कापण्याची धमकी मिळाली होती. करणी सेनेचे महिपाल मकराना यांनी म्हटले होते की, राजपूत कधीच महिलांवर हात उगारत नाहीत. परंतु आवश्यकता पडल्यास आम्ही दीपिका पादुकोणशी तसाच व्यवहार करू जसा, लक्ष्मणने शूर्पणखासोबत केला होता. पुढे बोलताना मकरानाने हेदेखील म्हटले की, दीपिका पादुकोणने लोकांच्या भावना भडकावू नये. राजपूत त्यांच्या मागण्यांवरून कधीच माघार घेणार नाहीत. दरम्यान, दीपिकाने ‘पद्मावती’ वादावर बोलताना म्हटले होते की, ‘हे सर्व भयावह आहे. वाद निर्माण करून आपण काय मिळविले. एक राष्ट्र म्हणून आपण कुठे आहोत. आपल्याला पुढे जायला हवे. अशाप्रकारे मागे येऊ नये.’