Join us
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर दीपिका पादुकोण लवकरच सादर करणार ऑफिशियल स्टेटमेंट

By गीतांजली | Updated: September 22, 2020 19:19 IST

दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशला NCBने चौकशीसाठी बोलवले होते.

सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात ड्रग्स अँगलसमोर आल्या एनसीबी या प्रकरणाची चौकशी करतेय. रिया चक्रवर्तीने सुशांत सिंगसाठी ड्रग्स खरेदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यानंतर आता अनेक ए-लिस्टर्स स्टार्सची नाव समोर येत आहे. सारा अली खान, रकुल प्रीत सिंगनंतर दीपिका पादुकोणचे नावसुद्धा समोर आले. मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबत झालेल्या 2017मधील व्हॅट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्सबाबत बोलल्याचे समोर आले आहे. दीपिकाचे नाव यात आल्यावर तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. लवकरच अभिनेत्रीकडून ऑफिशियल स्टेटमेंट येण्याची शक्यता आहे. दीपिका पादुकोण आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले जाते आहे. 

एनसीबी पुढच्या आठवड्यात दीपिकाला चौकशीसाठी बोलण्याची शक्यता आहे. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशला NCBने चौकशीसाठी बोलवले होते.     सुशांत सिंह राजपूतची 'टॅलेंट मॅनेजर' जया साहाच्या एका कथित चॅटमध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सूत्रांनुसार, 'D'चा अर्थ दीपिका पदुकोण आणि 'K'चा अर्थ करिश्मा, असा सांगण्यात येत आहे. करिश्मा हे जया साहाच्या असोसिएटचे नाव आहे.

माध्यमांत प्रसिद्ध झालेले दीपिका करिश्माचे चॅट दीपिका : आपल्याकडे माल आहे का? करिश्मा : आहे पण घरी आहे. मी वांद्र्यात आहे. करिश्मा : जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते. दीपिका : हो. प्लीज करिश्मा : अमितकडे आहे, तो ठेवतो. दीपिका : Hash ना? दीपिका : गांजा नाही करिश्मा : कोकोकडे तू केव्हा येते आहे. दीपिका : साडे 11 ते 12 च्या दरम्यान

सारासह यांना पाठवण्यात येणार समनतपास संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मादक पदार्थांशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसंदर्भात एनसीबी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांना चौकशीसाठी बोलावणार आहे.

 

ड्रग्स केसमध्ये नाव येताच दीपिका झाली ट्रोल, लोक म्हणाले - एक चुटकी ड्रग्स की किमत तूम क्या जानो...

 

टॅग्स :दीपिका पादुकोणसुशांत सिंग रजपूत