Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण पहिल्यांदाच दिसणार? 'सिंघम अगेन' च्या ट्रेलर लाँचची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 13:59 IST

येत्या ७ तारखेला 'सिंघम अगेन' चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडणार आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) गेल्या महिन्यात लेकीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दीपिका आणि रणवीर दोघांचंही जग तिच्याच अवतीभोवती आहे. दीपिका आता कामातून ब्रेक घेणार अशीही एक चर्चा झाली. मात्र आता लेकीच्या जन्मानंतर दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे. आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) च्या ट्रेलर लाँचला दीपिकाही येऊ शकते अशी चर्चा आहे.

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होत आहे. त्याआधी येत्या ७ तारखेला सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडणार आहे. सिनेमात अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर आणि दीपिका पदुकोण अशी तगडी स्टारकास्ट आहे. एवढ्या बिग बजेट आणि चर्चेतील सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी दीपिकाही येईल असाच चाहत्यांचा अंदाज आहे. 'न्यू मॉम' दीपिकाला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

'सिंघम अगेन' चा ट्रेलर लाँच एकदम ग्रँड पद्धतीने होणार आहे. जवळपास २००० लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील अशी चर्चा आहे. ट्रेलर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ७ ऑक्टोबर रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे हा सोहळा रंगणार आहे. माध्यमांसोबतच सर्व कलाकार आणि चाहतेही या सोहळ्यासाठी येणार आहेत. हा यावर्षीचा सर्वात ग्रँड ट्रेलर लाँच सोहळा असणार आहे. त्यातच ट्रेलर लाँचला दीपिका पदुकोण येईल ही शक्यताही नाकारता येत नाही. 

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड