Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरच्या लग्नाला जाणार नाही दीपिका पादुकोण, हे आहे त्यामागचे खरे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 12:05 IST

बॉलिवूड अभिनेता सोनम कपूर तिच्या लग्नाला घेऊन सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेत आहे. लवकरच ती तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नाच्या बंधनात ...

बॉलिवूड अभिनेता सोनम कपूर तिच्या लग्नाला घेऊन सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेत आहे. लवकरच ती तिचा बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. बॉलिवूडमधील या रॉयल वेडिंगला अनेकजण उपस्थित असणार आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या लग्नसोहळ्यात बॉलिवूडची मस्तानी हजेरी लावू शकणार नाही आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात येणाऱ्या काही दिवसात दीपिका पादुकोणचे शेड्यूल खूप व्यस्त आहे. ती सोनम कपूरच्या लग्नाच्या दरम्यान एक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परदेशात जाणार आहे. यामुळे ती सोनमच्या लग्नाला जाऊ शकणार नाहीये. दीपिका पादुकोणच्या शेड्युलबाबत बोलायचे झाले तर ती 24 तारखेला न्यूयॉर्कला जाणार आहे. तिथे होणाऱ्या टाइम 100 गालाचा हिस्सा दीपिका बनणार आहे.  टाईमने जाहीर केलेल्या यादीत दीपिकाचे नाव जगातील सगळ्यात 100 प्रभावशाली व्यक्तिच्या यादीत सामील आहे.ALSO READ :    सोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर!न्यूयॉर्कनंतर ती कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रांसला जाणार आहे. 8 मे ते 19 मे पर्यंत हा इव्हेंट चालणार आहे. हा इव्हेंट संपल्यानंतर दीपिका मुंबईत परतणार आहे. तर सोनमचे लग्न 7 मे रोजी होणार आहे. सोनमच्या लग्नाबाबत बोलायचे झाले तर तिची  वेडिंग सेरेमनी आण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार, कविता सिंगचा हा बंगला ५५ हजार स्केअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे. या परिसरात सध्या प्रॉपर्टीच्या किमती एक लाख रुपये प्रती फूट इतकी आहे. या सी फेसिंग बंगल्यात एक मोठे पूजाघर (मंदिर) आहे. ज्याठिकाणी श्री गणेशाची मूर्ती आहे. त्याचबरोबर या घराच्या दक्षिण बाजूला एक झरोखा (खिडकी) आहे. दरम्यान, कपूर परिवारातील सोनमचा विवाह सर्वात महागडा विवाह ठरणार आहे. सध्या संगीताची रिहर्सल अनिल कपूरच्या जुहू बंगल्यात सुरू आहे. सध्या कपूर कुटुंबीयांच्या घरी सोनमच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे.