Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पदुकोनचा खूप अभिमान वाटतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:16 IST

प्रसिद्ध उद्योजक विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याने त्याची एकेकाळची मैत्रिण दीपिका पदुकोन हिची प्रशंसा केली आहे. आपल्याला ...

प्रसिद्ध उद्योजक विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याने त्याची एकेकाळची मैत्रिण दीपिका पदुकोन हिची प्रशंसा केली आहे. आपल्याला तिचा अतिशय अभिमान असल्याचे त्याने म्हटले आहे.  दीपिका एकामागे एक असे यशस्वी चित्रपट देत आहे. अशावेळी तुझा दीपिकासोबत अजून संपर्क कायम आहे का, या प्रश्नावर तो म्हणाला, होय. आम्ही एकमेकांना अधूनमधून भेटत असतो. बस्स! सिद्धार्थला सध्या नवी मैत्रिण मिळाली असून तिचे नाव सांगण्यास मात्र त्याने नकार दिला.