दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. दीपिकाचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. तिच्या अदांवर चाहते फिदा होतात. दीपिका सध्या 'स्पिरीट' या सिनेमामुळेही चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी 'स्पिरिट' सिनेमातून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि तिच्या जागी तृप्ती डिमरीला घेतलं. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच लीक केल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला. एक गूढ पोस्ट शेअर करत त्यांनी दीपिकावर निशाणा साधला. या वादावर आता दीपिकानं अप्रत्यक्षपणे सडेतोड उत्तर दिलंय.
दीपिकानं नुकतंच ने स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी तिनं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानांना कशी सामोरी जाते, याबद्दल सांगितलं. दीपिका म्हणाली, "मला वाटते की मला संतुलित ठेवणारी गोष्ट म्हणजे फक्त खरे आणि प्रामाणिक असणे. जेव्हा जेव्हा मी कठीण परिस्थिती किंवा आव्हानांना तोंड देते, तेव्हा मला वाटते की माझ्या आतला आवाज ऐकणे, निर्णय घेणे आणि त्या निर्णयांवर टिकून राहणे, हे सगळं मला खूप शांती देतं. तेव्हाच मला सर्वात जास्त आरामदायी वाटतं".
दीपिकाचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये तिनं कुठेही 'स्पिरिट' सिनेमा किंवा संदिप रेड्डी वांगा यांचं नाव घेतलं नाही. पण, तिचं हे ठाम उत्तर त्यांच्यासाठीचं होतं, असा अंदाज तिच्या चाहत्यांनी बांधला आहे.
दीपिकाचं नाव न घेता संदीप रेड्डी वांगा यांनी काय केले होते आरोप?
संदीप रेड्डी वांगा यांनी ट्विट करत दीपिकाचे नाव न घेता तिच्यावर स्क्रिप्ट लीक केल्याचा आरोप केला. त्यांनी लिहलं, "जेव्हा मी एखाद्या कलाकाराला स्क्रीप्ट सांगतो. त्यावेळी माझ्या त्या व्यक्तीवर १०० टक्के विश्वास असतो. तेव्हा एक अघोषित, पटकथा उघड न करण्याचा करार होतो. पण, हे करून तू कोणत्या पद्धतीची व्यक्ती आहेस, हे दाखवून दिलं आहेस. ज्युनियर आर्टिस्टचा अपमान करणं आणि स्टोरी लीक करणं...हेच तुझं फेमिनिझम आहे का? एक फिल्ममेकर म्हणून मी यामागे अनेक वर्ष घालवली आहेत. फिल्ममेकिंग माझ्यासाठी सर्वकाही आहे. हे तुला समजलं नाही आणि कधी समजणारही नाही. पुढच्या वेळी सगळीच स्टोरी सांगून टाक. कारण मला काहीच फरक पडत नाही. खुंदक में बिल्ली खंबा नोचे..."