Join us

​ दीपिका पादुकोण म्हणते, रोमान्ससाठी माझ्याकडे वेळ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 11:34 IST

गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्समध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पुन्हा एकदा कानावर येऊ लागल्या आहेत. ...

गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्समध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या पुन्हा एकदा कानावर येऊ लागल्या आहेत. असे काही नसावे, अशी आम्ही आशा करतो. पण दोघांमध्ये सगळेकाही आॅलवेल नाही, इतके मात्र नक्की. अलीकडे दीपिका जे काही बोलली, त्यावरून तरी हेच वाटतेय. अर्थात दीपिकाच्या बोलण्यावरून आम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाही. पण एका मुलाखतीत दीपिका जे काही बोलली, त्यावरून आम्ही नाही पण इतर लोक मात्र नक्कीच  निष्कर्ष काढू शकतात.हॉलिवूडमध्ये बिझी असल्याने कुटुंब आणि मित्रांसाठी मला वेळच मिळू शकलेला नाही, हे दीपिकाने या मुलाखतीत प्रामाणिकपणे कबुल केले. पण यानंतर दीपिकाने काहीसे धक्कादायक विधान केले. या मुलाखतीत दीपिकाला रोमान्सबद्दल विचारले गेले. यावर माझ्याकडे तूर्तास रोमान्ससाठी अजिबात वेळ नाहीय, असे तिने एकाच वाक्यात सांगून टाकले. सध्या तरी रोमान्सला मी सगळ्यांत शेवटच्या स्थानी ठेवले आहे. माझ्या प्राधान्य यादीत रोमान्स सगळ्यांत शेवटच्या जागेवर आहे. कारण याशिवाय अनेक महत्त्वाच्या गोष्टी मला करायच्या आहेत. रोमान्सला माझ्या आयुष्यात स्थानच नाही, असे मी म्हणणार नाही. हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. पण तूर्तास ही गोष्ट माझी प्राथमिकता नक्कीच नाही, असे दीपिका यावेळी म्हणाली.अलीकडे ‘एक्सएक्सएक्स: रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या भारतातील प्रीमिअरला रणवीर व दीपिका एकत्र दिसले होते. पण तेव्हापासून अनेक इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसले नाही. आता दीपिका हे का बोलली, हे आम्हाला ठाऊक नाही. ( याद्वारे रणवीरपर्यंत  थेट मॅसेज पोहोचवण्याचा तर तिचा उद्देश नसावा ना?) एकेकाळी दीपिका व रणवीर यांच्यातील रोमान्स चांगलाच बहरू लागला होता. पण आता यासाठी माझ्याकडे वेळच नाही, असे दीपिका म्हणत असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे.