Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाच वर्षे जुना ‘लकी’ ड्रेस घालून ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला पोहोचली दीपिका पादुकोण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 14:12 IST

‘पद्मावत’च्या मार्गातील सगळी विघ्ने दूर कर, अशी प्रार्थना करण्यासाठी काल अभिनेत्री दीपिका पादुकोण सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली आणि विघ्नहर्त्याला साकडे ...

‘पद्मावत’च्या मार्गातील सगळी विघ्ने दूर कर, अशी प्रार्थना करण्यासाठी काल अभिनेत्री दीपिका पादुकोण सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली आणि विघ्नहर्त्याला साकडे घातल्यानंतर काही तासांतच ती ‘पद्मावत’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजर झाली. या स्क्रिनिंग इव्हेंटला रणवीर सिंग अन् दीपिका या दोघांनीही अगदी हातात घात घालून एन्ट्री घेतली. लव्हबर्ड्सच्या या एन्ट्रीचे फोटो तुम्ही पाहिलेच. या इव्हेंटमधील दीपिका व रणवीरचा ट्रॅडिशनल लूकही तुम्ही पाहिला. पण कदाचित एका गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले नसावे. आम्ही मात्र ती गोष्ट अगदी अचूक हेरली. कुठली? तर दीपिकाच्या रिपीट ड्रेसची. होय, ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला दीपिकाने पाच वर्षांपूर्वीचा एक ड्रेस रिपीट केलेला दिसला. होय, दीपिकाने ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला तोच व्हाईट अनारकली कुर्ता घातला होता, जो ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या प्रमोशनवेळी घातला होता.‘चेन्नई एक्स्प्रेस’ २०१३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका शाहरूख खानसोबत दिसली होती. यावेळी दीपिकाने व्हाईट अनारकली कुर्ता घातला होता. काल ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगलाही दीपिकाने हाच कुर्ता रिपीट केला.चर्चा खरी मानाल तर, हा ड्रेस दीपिका ‘लकी’ मानते. दीपिकाने यापूर्वीही अनेकदा तिचे काही कपडे खास इव्हेंटला रिपीट केले आहेत. एकदा एका इव्हेंटमध्ये दीपिकाला रिपीट कपड्यांबद्दल प्रश्नही विचारला गेला होता. त्यावेळी दीपिकाने अगदी साधे सरळ उत्तर दिले होते. जे कपडे तुम्हाला आवडतात, ते रिपीट करण्यात काय वाईट आहे, असे ती म्हणाली होती.ALSO READ : ​ ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला हातात हात घालून दिसले लव्हबर्ड्स रणवीर सिंग अन् दीपिका पादुकोण ! ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट त्यावर्षी सर्वात मोठा हिट होता. केवळ त्यावर्षीचाचं नाही तर दीपिकाच्या करिअरमधीलही तो बिगेस्ट हिट होता. कदाचित दीपिकाला ‘पद्मावती’कडूनही अशाच बिगेस्ट हिटची अपेक्षा आहे.  त्याचमुळे सिद्धीविनायकाला साकडे घालण्यापासून तर लकी ड्रेस रिपीट करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी दीपिका करताना दिसतेय. तूर्तास दीपिकाचा ‘पद्मावत’ विरोधात देशभर हिंसक निदर्शने सुरु आहेत. या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत काही राजपूत संघटनांनी ‘पद्मावत’ला विरोध चालवला आहे.