Join us

​दीपिका पादुकोण नाही, मजीदींच्या चित्रपटात दिसणार मालविका मोहनन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:06 IST

इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजीदी यांच्या  Beyond The Clouds या चित्रपटातून शाहिद कपूरचा भाऊ इशान बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय, हे ...

इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजीदी यांच्या  Beyond The Clouds या चित्रपटातून शाहिद कपूरचा भाऊ इशान बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय, हे तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटातील लिडिंग लेडीचे नाव मात्र आत्तापर्यंत गुलदस्त्यात होते. मजीदींच्या या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण हिने  तिच्या डी-ग्लॅम अवतारात लूक टेस्ट दिली होती. त्यामध्ये ती मुंबईच्या धोबी घाटावर झोपडपट्टीत राहणाºया मुलीच्या रुपात दिसली होती, हे आपल्याला ठाऊक आहे. पण दीपिका यात चित्रपटात नाहीय, हे स्पष्ट करण्यात आले आहे. मग या चित्रपटातील लिडींग लेडी असणार तरी कोण? नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. होय, या चित्रपटाची लिडींग लेडी असणार आहे, मालविका मोहनन.  होय, सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के यू मोहनन यांची लाडकी लेक आणि मल्याळम चित्रपटांची एक लोकप्रीय अभिनेत्री. मालविकाला मजीदींच्या या चित्रपटाची लॉटरी लागली आहे. चित्रपटाच्या मेकर्सनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खुद्द मजीदी यांनी मालविकाची लूक टेस्ट घेतली आणि तिच्या परफॉर्मन्सनी मजीदी कमालीचे प्रभावित झालेत. मालविकाने सन २०१३मध्ये मल्याळम चित्रपटाद्वारे अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. या चित्रपटाचे नाव आहे ‘नानू मट्टू वरलक्ष्मी.’Beyond The Clouds हा बहिण-भावाच्या नात्यावर आधारित   चित्रपट आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी माजीद यांनी नीलीमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा तसेच शाहिद कपूरचा भाऊ इशान याची निवड केली आहे. या चित्रपटाचे आधीचे नाव ‘फ्लोटिंग गार्डन्स’असे होते. पण आता याचे नाव बदलून Beyond The Clouds असे ठेवण्यात आले आहे.