धकधक गर्ल माधुरी दीक्षित या कलाकारांना देते नृत्याचे धडे,पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:19 IST
आपले स्मित हास्य, लटके झटके आणि दिलखेचक अदांनी तरुणांची मने घायाळ करणारी धकधक गर्ल आणि हिंदी चित्रपटसृष्टीची खरीखुरी डान्सिंग ...
धकधक गर्ल माधुरी दीक्षित या कलाकारांना देते नृत्याचे धडे,पाहा PHOTO
आपले स्मित हास्य, लटके झटके आणि दिलखेचक अदांनी तरुणांची मने घायाळ करणारी धकधक गर्ल आणि हिंदी चित्रपटसृष्टीची खरीखुरी डान्सिंग क्वीन म्हणजे माधुरी दीक्षित.आता हीच अभिनेत्री कलाकारांसाठीही डान्स गुरु बनल्याचे पाहायला मिळत आहे.माधुरी आलिया भट्ट आणि वरुण धवन या तिघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत माधुरी या दोघांना डान्स शिकवताना दिसत आहे. आगामी ‘कलंक’ या सिनेमासाठी आलिया आणि वरूण माधुरीकडून डान्सचे धडे घेत असल्याचे बोलले जात आहे.'बकेट लिस्ट'नंतर ती दुसऱ्यांदा करण जोहरसोबत काम करते आहे. याआधी माधुरीने करण जोहरचा चित्रपट 'ये जवानी है दीवानी'मध्ये डान्स केला होता. Also Read:माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची सिजलिंग केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसणार ऑनस्क्रिनकरण जोहरचा आगामी चित्रपट 'कलंक'हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या सर्वोत्तम सिनेमापैकी एक असणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार करण जोहरने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 15 कोटींचा सेट तयार केला आहे.मुंबईतल्या गोरगावमध्ये फिल्म सिटीमध्ये एक भव्यदिव्य सेट तयार करण्यात आला आहे.सेटचे फोटो लीक होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. करण जोहर, साजिद नाडियाडवाला आणि अपूर्व मेहता निर्मित हा चित्रपट अभिषेक बर्मन दिग्दर्शित करणार आहे. या मेगास्टारर चिपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे. जवळपास 21 वर्षानंतर या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा एकत्र रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. कलंकच्या शूटिंगशिवाय माधुरी मराठी चित्रपट बकेट लिस्टच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट 25 मे रोजी रिलीज होणार आहे. बकेट लिस्ट या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली आहे.