या प्रश्नावर केली दीपिका पादुकोणने सगळ्यांची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 15:23 IST
दीपिका पादुकोण सध्याच्या घडीची बॉलिवूडमधील सगळ्यात महागडी हिरोईन आहे. काही दिवसांपूर्वीच मीडियामध्ये अशी चर्चा होती की पद्मावतीसाठी आपल्या सहकलाकारांपेक्षा ...
या प्रश्नावर केली दीपिका पादुकोणने सगळ्यांची बोलती बंद
दीपिका पादुकोण सध्याच्या घडीची बॉलिवूडमधील सगळ्यात महागडी हिरोईन आहे. काही दिवसांपूर्वीच मीडियामध्ये अशी चर्चा होती की पद्मावतीसाठी आपल्या सहकलाकारांपेक्षा जास्त मानधन दीपिका पादुकोणने घेतले आहे. नुकतेच दीपिकाला 3 ड्री ट्रेलर लाँचच्या दरम्यान या संदर्भात हाच प्रश्न विचारण्यात आला. कि खरंच तुला इतर कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळाले आहे का ? यावर दीपिका म्हणाली की, माझ्या मानधनाबाबत बोलायचे झाले तर मी त्याबाबत फारशी उत्साहित नसते. मला जीही रक्कम मिळते त्यावर मला गर्व असतो. मी इतके नक्कीच सांगेन की मला मिळालेल्या मानधनाबाबत मी खूप खूश आहे. मात्र यापेक्षा जास्त मला यागोष्टीचा आनंद आहे की चित्रपटाच्या मेकर्सनी माझ्या पोस्टरवर जास्त पैसे खर्च केले.'' तर थोडक्यात दीपिकाने यावर आपल्या अंदाजात उत्तर देत अनेकांची बोलतीच बंद केली. पुढे ती म्हणाली की, पद्मावती चित्रपटाचा बजेट खूप जास्त आहे. आतापर्यंत आम्ही अनेक सुंदर महिलांच्या भूमिका पडद्यावर दाखवल्या आहेत. मला अशा आहे की पद्मावतीची भूमिका भारतीय चित्रपटांमध्ये एक नवा पायंडा पाडेल. ALSO RAED : दीपिका पादुकोणचे ‘घूमर’ नृत्य पाहून व्हाल दंग! ‘पद्मावती’चे पहिले गाणे रिलीज !!मिळालेल्या माहितीनुसार पद्मावतीसाठी रणवीर सिंग पेक्षा जास्त मानधन दीपिका पादुकोणला देण्यात आले आहे. दीपिकाने बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूड चित्रपटातदेखील काम केले आहे. दीपिका यात राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिने तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. राणी पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंगअल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटातील दीपिकाचे घूमर गाणं देखील प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.