Join us

गोलमाल 4 या चित्रपटात दीपिका की अालिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 12:44 IST

गोलमाल या चित्रपटाच्या पहिल्या भागात रिमी सेन झळकली होती. त्यानंतरच्या तिन्ही भागात करिना कपूरने तिची जागा घेतली. गोलमालच्या तिन्ही ...

गोलमाल या चित्रपटाच्या पहिल्या भागात रिमी सेन झळकली होती. त्यानंतरच्या तिन्ही भागात करिना कपूरने तिची जागा घेतली. गोलमालच्या तिन्ही भागांमध्ये करिनाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण आता करिना आई बनणार असल्याने गोलमाल 4 या चित्रपटाचा ती भाग नसणार आहे. या चित्रपटात तिची जागा अालिया भट्ट अथवा दीपिका पादुकोण घेणार आहे. अर्शद वारसीनेच ही बातमी मीडियाला दिली आहे. तो सांगतो, गोलमाल 4 या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या चित्रपटात करिनाच्या ऐवजी आलिया अथवा दीपिका झळकणार आहे. गोलमालचे चित्रीकरण म्हणजे तुषार, अजय, श्रेयस आणि माझ्यासाठी एक पिकनिकच असते. यावेळी आम्ही सगळेच करिनाला खूप मिस करणार आहोत.