Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणच्या मानधनाचा आकडा ऐकून मेकर्सही शॉक्ड, तरच करणार प्रभाससोबत काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 20:00 IST

पूर्ण होणार का दीपिकाची डिमांड?

ठळक मुद्दे दीपिकाला अलीकडे प्रदर्शित झालेला ‘छपाक’ हा सिनेमा अपेक्षेनुसार कमाई करू शकला नाही.

कोरोनामुळे अख्खे जग ठप्प झाले आहे. भारतही ठप्प झाला़ बॉलिवूडही ठप्प आहे. म्हणायला चित्रपट व मालिकांचे शूटींग बंद आहे. चित्रपटांचे रिलीज लांबणीवर पडलेय. पण अशातही एक बातमी सध्या जोरात आहे. होय, बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण व ‘बाहुबली’ प्रभास या दोघांना एकत्र कास्ट करण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे. होय, ‘महानती’ चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांना एका प्रोजेक्टमध्ये दीपिकाला प्रभासच्या अपोझिट कास्ट करण्याची इच्छा आहे. पण तूर्तास दीपिकाने या प्रोजेक्टसाठी मागितलेला मानधनाचा आकडा पाहून त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आलीय.

 चर्चा खरी मानाल तर दीपिकाने या चित्रपटासाठी भल्यामोठ्या मानधनाची डिमांड केली आहे. तिची डिमांड ऐकून मेकर्सही शॉक्ड आहेत. दीपिकाने कितीची डिमांड केली आहे, हे नेमके कळलेले नाही. पण हो, तिची डिमांड ऐकून मेकर्सलाही धक्का बसला आहे, इतके नक्की. आता अशात मेकर्स दीपिकाची ही डिमांड पूर्ण करतील की नाही, हा प्रश्न कायम आहे. नाग अश्विनचा हा सिनेमा एक सायन्स फिक्शन चित्रपट असणार आहे.

 निर्माता अश्विनी दत्त हा सिनेमा प्रोड्यूस करत आहेत. या बिग बजेट सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी सुरु होणार आहे. दीपिका या चित्रपटात दिसली तर प्रभास व तिची जोडी प्रेक्षकांसाठी एक खास ट्रिट असणार आहे. दीपिका ही प्रभासची आवडती अभिनेत्री आहे. दीपिकासोबत काम करायला प्रभास किती उतावीळ आहे, हेही लपून राहिलेले नाही. प्रभासने स्वत:च अनेक मुलाखतीत हे सांगितले आहे.

 दीपिकाला अलीकडे प्रदर्शित झालेला ‘छपाक’ हा सिनेमा अपेक्षेनुसार कमाई करू शकला नाही. पण याऊपरही दीपिकाचे स्टारडम कमी झालेले नाही. आजही ती नंबर 1 स्टार आहे. तूर्तास कोरोनाच्या संकटामुळे दीपिका घरात कैद आहे. पण हे संकट निवळताच तिचा 83 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात दीपिका पती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.  

टॅग्स :दीपिका पादुकोणप्रभास