Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दीपिका नाही, सलमानसोबत कॅटरिना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 22:19 IST

दीपिका पदुकोण आणि सलमान ही नवी कोरी जोडी दिग्दर्शक कबीर खानच्या ‘ट्युबलाईट’ नामक आगामी चित्रपटात दिसणार, अशी चर्चा अनेक ...

दीपिका पदुकोण आणि सलमान ही नवी कोरी जोडी दिग्दर्शक कबीर खानच्या ‘ट्युबलाईट’ नामक आगामी चित्रपटात दिसणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र आता ही चर्चा म्हणजे निव्वळ अफवा ठरली आहे. कारण खुद्द कबीरनेच याबाबत खुलासा केला आहे. या चित्रपटासाठी मी दीपिकाशी संपर्क साधलेला नाही, असे त्याने नुकतेच स्पष्ट केले. पण कबीरच्या या खुलाशानंतरही ‘ट्युबलाईट’मध्ये दीपिका नसेल तर मग कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल, हा प्रश्न अनुत्तरीत होताच. पण आता एक नवी चर्चा आहे. कबीरने या चित्रपटासाठी सलमानच्या अपोझिट कॅटरिनाला घेण्याचा निर्णय घेतला आहे म्हणे. यासंदर्भात बोलणी सुरु आहे. ही बोलणी फायनल झाल्यावर कॅटरिना सलमानसोबत पुन्हा एकदा झळकणार हे निश्चित होणार. कबीरसोबत कॅटचे चांगले संबंध आहे. कबीरच्या अनेक चित्रपटात कॅट दिसली आहे. आता बघूया, ‘ट्युबलाईट’मध्ये ती कधी दिसते ते!!