बॉलिवूडची डिम्पल गर्ल दीपिका पादुकोण हिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झांडर केज’ रिलीज झाला आहे. या चित्रपटात दीपिका हॉलिवूड अॅक्शन स्टार विन डिजेलच्या ओपझिट दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होत असतानाचा दीपिकाला अमूल कंपनीने अनोखी भेट दिली आहे. अमूलच्या नव्या कार्टूनमध्ये दीपिका पादुक ोण व विन डिझेल यांची जोडी दाखविण्यात आली आहे.
अमूलने केलेल्या जाहिरातीमध्ये दीपिका पादुकोण व विन डिझेल एकमेकांसोबत खास अंदाजात आहेत. त्यांच्यासोबत अमूल गर्ल रुबी देखील उभी दिसते. अमूलने आपल्या या जाहिरातीला दीपिकास अॅडव्हेंचर (Deepika's Advinture!) हे नाव दिले असून खाली Lipxxxxxsmacking! ही टॅग लाईन दिली आहे. अमूल आपल्या जाहिरातीमधून विविध ट्रेंडिंग विषयावर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी अमूलने आपल्या जाहिरातीमध्ये क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या कथित साखरपुड्याच्या बातम्यांवर आधारित एक कार्टून जाहिरात प्रसिद्ध केली होती. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधील चर्चीला जाणारा विषय हाताळला आहे.
विन डिझेल व दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ट्रिपल एक्स : द रिर्टन आॅफ झांडर केज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुरुवारपासून विन डिझेल भारतात आहे. या चित्रपटाच्या प्रिमिअरला त्याने दीपिकासोबत हजेरी लावली आहे. यावेळी बॉलिवूडचे अन्य सेलिब्रेटीज देखील हजर होते. त्यावेळी रणवीर सिंह व विन डिझेल यांच्यात झालेली बातचित मजेदार ठरली होती. दीपिकाची प्रशंसा करताना विनने तिचा उल्लेख ‘क्वीन’ व ‘अॅन्जल’ असा केला होता. विन डिझेल व दीपिका पादुकोण यांच्या भूमिका असणारा ‘ट्रिपल एक्स : दी रिटर्न आॅफ झांडर केज’ हा सर्वप्रथम भारतात रिलीज होणार आहे. अन्य देशांत तो १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
#Amul Topical: Bollywood star’s Hollywood debut! pic.twitter.com/PhozXzVugc— Amul.coop (@Amul_Coop) January 13, 2017