दीपिका, ऐश्वर्या की सोनम? ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर कोण ठरणार सरस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 13:40 IST
आज (१७ मे)पासून ७० वा कान्स फिल्म फेस्टिवल सुरु होतोय. यंदाच्या कान्स सोहळ्याकडे सगळ्या बॉलिवूडप्रेमींचे डोळे टिकले आहेत आणि याचे कारणही तसेच आहे. होय, बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन, बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण या तीन अभिनेत्री यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहेत.
दीपिका, ऐश्वर्या की सोनम? ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर कोण ठरणार सरस?
आज (१७ मे)पासून ७० वा कान्स फिल्म फेस्टिवल सुरु होतोय. यंदाच्या कान्स सोहळ्याकडे सगळ्या बॉलिवूडप्रेमींचे डोळे टिकले आहेत आणि याचे कारणही तसेच आहे. बॉलिवूडच्या तीन सौंदर्यवती कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जगभरात कान्स फिल्म फेस्टिवलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक पातळीवरचे फिल्म्स अॅण्ड ग्लॅमर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात. यंदा भारतीयही या सोहळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. त्याचे कारणही खास आहे. होय, बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन, बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण या तीन अभिनेत्री यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहेत. याठिकाणी यातिघीही जणी एका आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. दीपिकाची कान्सची उत्सुकता तर शिगेला पोहोचली आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून ती व्यक्त होत आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले पाही फोटो पाहता दीपिका या सोहळ्यासाठी जरा जास्त उत्सुक असल्याचे दिसते. कान्सला पोहोचण्यापासून तर रेड कार्पेटवर उतरण्यासाठी तयार होत असतानापर्यंतचे अनेक फोटो दीपिकाने शेअर केले आहेत. दीपिका १७/१८ मे रोजी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविणार आहे.ऐश्वर्या राय १९/२० मे रोजी आणि सोनम कपूर २१/२२ मे रोजी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणार आहेत, ALSO READ : ७०व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी पोहोचली मस्तानी दीपिका पादुकोण!याआधी २०१० मध्ये दीपिका कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली होती. रोहित बाल याने डिझाईन केलेल्या साडीत दीपिकाने कान्सच्या रेडकार्पेटवर आपल्या सौंदयार्चा जलवा दाखवला होता. यावर्षी दीपिका रेड कार्पेटवर उतरलीच तर कुठल्या स्टाईलमध्ये उतरेल, निश्चितपणे हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. गतवर्षी ऐश्वर्या राय बच्चन पर्पल लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. यामुळे तिला ब-याच टिकेला सामोरे जावे लागले होते. याऊलट सोनम कपूरने तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशन स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे यावर्षी कान्समध्ये कोण वरचढ ठरतं, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. आता ऐश्वर्या व सोनमला दीपिकासारखी स्पर्धक मिळालीच तर ही स्पर्धा अधिक चुरसीची होणार, हे नक्की!