डिप्पी-रणवीरची बाळासोबत मस्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 08:41 IST
दीपिका पदुकोन तिच्या मित्राच्या लग्नासाठी श्रीलंकेला गेल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली होती. त्या लग्नाला रणवीर सिंग देखील गेला असल्याचे कळाले. ...
डिप्पी-रणवीरची बाळासोबत मस्ती!
दीपिका पदुकोन तिच्या मित्राच्या लग्नासाठी श्रीलंकेला गेल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगली होती. त्या लग्नाला रणवीर सिंग देखील गेला असल्याचे कळाले. मग काय चर्चेला तर उधाणच आले. लग्नातील अनेक फोटो त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यानंतर अजून काही फोटो नुकतेच लीक झाले आहेत. त्यात रणवीर आणि दीपिका हे संपूर्णपणे ब्लॅक ड्रेसमध्ये एकमेकांसोबत हॉट दिसत होते. त्याचबरोबर ते एका बाळाला खेळवत होते. दीपिकाने त्या बाळाला तिच्या दोन्ही हातांवर घेतले होते. आणि रणवीर चक्क मस्ती करत त्या बाळाला खेळवत होता. अजून एका फोटोत ते बाळ रणवीर कडे जातांना दिसत आहे. अत्यंत क्युट अशा या फोटोंना प्रचंड लाईक्स मिळत आहेत. या फोटोंकडे पाहिल्यानंतर वाटते की, नेमकं लहान कोण आहे? ते बाळ की डिप्पी-आर व्ही?