Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘डिअर जिंदगी’ : आलियाने उघड केले गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 17:07 IST

शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांच्या आगामी चित्रपटाचे नाव  ‘डिअर जिंदगी’  आहे, हे आपल्याला कळले आहेच. पण चित्रपटाची संपूर्ण ...

शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांच्या आगामी चित्रपटाचे नाव  ‘डिअर जिंदगी’  आहे, हे आपल्याला कळले आहेच. पण चित्रपटाची संपूर्ण टीम याबाबत कमालीची गोपनियता पाळताना दिसली. मात्र अखेर तो क्षण आलाच. आलिया भट्ट हिने स्वत: twitterवर चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा केली . अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने तिने चित्रपटाचे नाव जाहिर केले. यासाठी आलियाने शाहरूखसोबतचे एक पोस्टर शेअर केले. यात आलिया शाहरूखसोबत संवाद साधताना दिसते आहे. गौरी शिंदे दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित  ‘डिअर जिंदगी’  येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.