Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘डिअर जिंदगी’चा संबंध डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्याशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 20:55 IST

शाहरुख खानने आपल्या आगामी चित्रपटाचे कनेक्शन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नीशी जोडले आहे. कमी वयाच्या मुलीशी ...

शाहरुख खानने आपल्या आगामी चित्रपटाचे कनेक्शन अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नीशी जोडले आहे. कमी वयाच्या मुलीशी रोमांस करण्याच्या विषयावर त्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा दाखला दिला. तो ‘डियर जिंदगी’ या चित्रपटाच्या कथेसंदर्भात आपले मत व्यक्त करीत होता.  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान आपण हिलरी क्लिंटन यांना पसंती देत असल्याचे सांगितले होते. मात्र ‘डिअर जिंदगी’च्या कथेचा संदर्भ सांगताना त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या उल्लेख केला. आलियासोबत ‘डिअर जिंदगी’मध्ये काम करताना अडचण जाणविली नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात शाहरुख म्हणाला, ‘डिअर जिंदगीमध्ये माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत काम केले आहे. मी यात पाच वर्षांच्या मुलीसोबत रोमांस करीत नाहीये. कमी वयाच्या मुलींशी रोमांस करणे हा आपल्याकडे न्यूनगंडाचा विषय आहे’.बोलण्याच्या ओघात शाहरुख म्हणाला, वय आणि प्रेम यासाठी तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण का घेत नाही. डोनाल्ड व त्यांची पत्नी मेरेनिया यांच्यात वयाचे मोठे अंतर आहे. दोघांच्या वयात फरक असला तरी ते यशस्वी झाले आहेत हे त्यांच्या प्रेमकहाणीचे यश आहे. शाहरुख पुढे म्हणाला, ‘डिअर जिंदगी’ ही प्रेमकथा आहे. सर्वसामान्य प्रेमकथेपेक्षा थोडी वेगळी, विशेष म्हणजे यात वयाचा फरक असल्याचे तुम्हाला लक्षातही येणार नाही. शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये तो आलिया भट्टचा मेंटॉरच्या भूमिकेत पहायला मिळणार असल्याने याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात कुणाल कपूर याची देखील महत्त्वाची भूमिका आहे. सध्या आलिया व शाहरुख या चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त आहेत.