Join us

​राखीच्या दिवशी शाहरूख खानला असते ‘या’ फोनची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 15:23 IST

उद्या सोमवारी(७ आॅगस्ट) भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. बॉलिवूडमध्येही हा सण उत्साहात साजरा होतो.  किंगखान ...

उद्या सोमवारी(७ आॅगस्ट) भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. बॉलिवूडमध्येही हा सण उत्साहात साजरा होतो.  किंगखान शाहरूख खान हा सुद्धा हा सण साजरा करतो. या दिवशी शाहरूखला एका स्पेशल कॉलची प्रतीक्षा असते. दरवर्षी राखीच्या दिवशी शाहरूख खानला न चुकता राखीच्या शुभेच्छा देणारा फोन येतो आणि शाहरूख हा फोन घेतल्यानंतर आनंदाने सैरभैर होतो. आता हा फोन कुणाचा? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा.होय, अलीकडे शाहरूख खान कोलकात्यात ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी त्याने ममता दी व त्याच्या या आगळ्या-वेगळ्या नात्याविषयी खुलासा केला. दरवर्षी मी दीदीच्या (ममता बॅनर्जी) कॉलची प्रतीक्षा करतो.  दरवर्षी दीदी मला राखीच्या दिवशी फोन करून शुभेच्छा देतात, असे शाहरूखने यावेळी सांगितले. त्यामुळे आता उद्या राखीच्या दिवशी ममता दी शाहरूखला फोन करतात वा नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.शाहरूख खान आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाईट राईडर्स टीमचा मालक आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत शाहरूखचे एक वेगळेच नाते तयार झाले आहे. शाहरूख ममता यांना बहीण मानतो व त्यांना दीदी संबोधतो.शाहरूखचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा गत शुक्रवारी रिलीज झाला. अर्थात या चित्रपटाने प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा केली. पहिल्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेनुसार ओपनिंग मिळू शकले नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने १५.२५ कोटी रूपयांची कमाई केली. दुसºयादिवशी म्हणजे शनिवारीही चित्रपटाने जवळपास इतक्याच रूपयांचा गल्ला जमवला.