Join us

​‘त्या’ दिवशी कपिल शर्माने केला होता आत्महत्येचा विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:04 IST

कपिल शर्मा सध्या ‘फिरंगी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण या प्रमोशनदरम्यान कपिलची जखम पुन्हा ताजी झाली आहे. होय, सुनील ग्रोव्हरसोबतच्या ...

कपिल शर्मा सध्या ‘फिरंगी’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण या प्रमोशनदरम्यान कपिलची जखम पुन्हा ताजी झाली आहे. होय, सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणाने कपिल मनातून दुखावलायं. त्याची ही जखम  पुन्हा भळभळू लागलीयं.सुनील शो सोडून गेल्यावर कपिल डिप्रेशनमध्ये गेला. त्यातून बाहेर पडणे कपिलला बरेच जड गेले. या दिवसांत अगदी आत्महत्येचे विचारही त्याच्या मनात आले. ‘फिरंगी’च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी कपिलने स्वत: त्या दिवसांतील मन:स्थितीबद्दल सांगितले. ‘मी त्यादिवसात नैराश्याने ग्रासलो होतो. मद्याच्या अतिआहारी गेलो होतो. माझी ती अवस्था पाहून माझ्या एका मित्राने मला समुद्राकाठच्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये काहीदिवस राहण्याचा सल्ला दिला. जागेच्या बदलाने सगळे ठीक होईल, असे त्याला वाटले होते. पण त्याच्या त्या अपार्टमेंटमध्ये गेलो आणि बाल्कनीतून अथांग पसरलेला सागर पाहूल माझा मूड अचानक बदलला. बाल्कनीतून त्या अथांग पसरलेल्या समुद्रात स्वत:ला झोकून द्यावे, असा विचार माझ्या मनात आला. सगळे जग माझ्याविरूद्ध कट रचतेय, असे मला त्यादिवसांत वाटू लागले होते. पॅनिक अटॅक यायचे. कित्येक दिवस मी स्वत:ला माझ्या आॅफिसमध्ये कुत्र्यासोबत कोंडून घेतले होते. स्टेजवर चढण्याची हिंमत होईना. मी अनेक शूट रद्द केले. यानंतर लोकांनी स्वत: माझ्या शोवर येणे थांबवले आणि मग मी रडारवर आलो,’ असे कपिलने सांगितले. ‘त्या दिवसांत माझ्या टीममधील कुणीही मी असा का वागतोय? मला काय झालेय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण काही लोक माझ्यासोबत होते. त्यांचे प्रेम आणि पाठींब्यामुळे मी हळूहळू यातून बाहेर पडलो. मी काहीही चूक केलेली नसताना जगापासून का दूर पळतोय? असा प्रश्न मी स्वत:लाच केला आणि स्वत:ला शिक्षा देणे थांबवले. माझ्या काही मित्रांनी याकाळात माझी मदत केली आणि माझी हिंमत वाढली,’ असेही कपिलने सांगितले. एकंदर काय तर डिप्रेशनचे ते दिवस कपिलसाठी चांगलेच जड गेलेत. पण कपिल यातून बाहेर पडला आणि चाहत्यांना त्यांचा ‘कपिल’ नव्याने गवसला.ALSO READ: ​कपिल शर्माने ऐकवला सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणाचा वेगळाच किस्सा; म्हणे, भांडण झालेच नाही!