Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाप तशी लेक..! जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफचा स्विमिंग सूटमधील बोल्ड फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 20:20 IST

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यात दोन फोटो असून एका फोटोत ती आणि दुसऱ्या फोटोत जॅकी श्रॉफ दिसत आहेत.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सऱ्हास तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो पहायला मिळतात. बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो व्हायरल होताना दिसतात. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक स्विमिंग सूटमधील फोटो शेअर केला होता. तिने एक कोलाज शेअर केले आहे ज्यामध्ये जॅकी श्रॉफचा फोटो देखील आहे.

कृष्णा श्रॉफने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोघेही स्विमिंग सूटमध्ये दिसत आहेत. जॅकी श्रॉफचा जुना लूकमध्ये पाहायला मिळत आहे.  या फोटोला कॅप्शन देताना कृष्णाने असे म्हटले आहे की, जसे वडील तशी मुलगी. यामध्ये तिने जॅकी श्रॉफला देखील टॅग केले आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्ससोबतचे किस करतानाचे फोटो शेअर केले होते. कृष्णा आणि एबनचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते.

आता तिने बॉयफ्रेन्डसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. सोबत हार्ट इमोजीदेखील टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णा व तिच्या बॉयफ्रेन्डचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र याचदरम्यान कृष्णाने त्याच्यासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता. या फोटोनंतर दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.

टॅग्स :कृष्णा श्रॉफजॅकी श्रॉफटायगर श्रॉफ