Join us
Daily Top 2Weekly Top 5

या दिवशी, या तारखेला, निक जोनास म्हणणार, प्रियांका मुझसे शादी करोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 10:29 IST

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये स्पॉट झाले होते

ठळक मुद्देमीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये लग्न करणार आहेतनिक जोनस लग्नाच्या तयारीसाठी मुंबईत आला होता

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे जोधपूरमध्ये स्पॉट झाले होते. जोधपूरच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये प्रियांका व निक खरेदी करतानाही दिसले. ऐवढेच नाही तर दोघे उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगढच्या किल्ल्यात फेरफटाका मारून तिथल्या मॅनेजमेंटशी बोलताना देखील दिसले. त्यावेळी लग्नाचे डेस्टिनेशन पाहण्यासाठी ती जोधपूरला आल्याची चर्चा होती. आता प्रियांकाच्या आणि निक जोनसची लग्नाची तारीखदेखील कन्फर्म झाली आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये लग्न करणार आहेत. 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या विधी होणार आहेत. दोघे एका पॅलेसमध्ये वेडिंग करणार असल्याचे समजतेय. निक जोनस लग्नाच्या तयारीसाठी मुंबईत आला होता. प्रियांका आणि निकने लग्नाच्या तयारीची जबाबदारी स्वत: घेतली आहे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत दोघे कटाक्षाने लक्ष घालतायेत.  

प्रियांका -निकचा 18 ऑगस्टला रोका झाला होता. विधिवत पार पडलेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोघांच्याही कुटुंबातले काही मोजकेच लोक उपस्थित होते. त्यानंतर सगळ्यांचे लक्ष प्रियांकाच्या लग्नाकडे लागले होते अखेर लग्नाची तारीख ही पक्की झाली आहे. दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. प्रियांका- निकची ओळख गतवर्षी झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री- झाली या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास