Join us

​श्रद्धा कपूरचा ‘कॉस्मोपॉलिटन’च्या कव्हरपेजवर डॅशिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 20:18 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने समीक्षकांना प्रभावित केल्यावर तिची दखल आता मोठ्या फॅशन मॅगझिनने ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने समीक्षकांना प्रभावित केल्यावर तिची दखल आता मोठ्या फॅशन मॅगझिनने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले फॅशन मॅगझिन ‘कॉस्मोपॉलिटन’च्या आगामी अंकाच्या कव्हरपेजवर श्रद्धा कपूरने स्थान मिळविले असून तिचा डॅशिंग अंदाज लक्ष वेधणारा ठरला आहे. फॅशन जगात कॉस्मोपॉलिटन या नियतकालिकाचे आगळे वेगळे स्थान आहे. अनेक बॉलिवूड कलावंतांनी कॉस्मोपॉलिटनसाठी फोटोशूट केले आहे. प्रेमाचा महिना म्हणून ख्यात असलेल्या फे ब्रुवारीमध्ये प्रसिद्ध होणाºया अंकाच्या कव्हरपेजवर श्रद्धा कपूरचा डॅशिंग अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पांढºया रंगाच्या शर्टवर फुलांचे प्रिंट असलेला शर्ट व पांढºया रेषा असलेला काळ्या रंगाची ब्रिफ घातली आहे. श्रद्धाचा हा लूक आकर्षक असून तिने लाल रंगाच्या मोतीजडीत अंगठ्या घातल्या आहेत. तर इअररिंग्स दाखविण्यासाठी खास पोझ दिली आहे. या अंकाची कव्हरस्टोरी श्रद्धा कपूरवर आधारित असून श्रद्धा कपूर : द साईड यू आर नेव्हर सीन बिफोर (श्रद्धा कपूर : कधीही न पाहिलेली बाजू) या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्रद्धा कपूर सध्या हसीना पारकरच्या बायोपिकमध्ये काम करीत असून यात ती अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर दाऊदची भूमिका साकारतो आहे. श्रद्धाचा मागील चित्रपट ओके जानू बॉक्स आॅफिसवर तग धरू न शकल्याने तिला आगामी  ‘हसीना द क्वीन आॅफ मुंबई’ या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान कॉस्मोपॉलिटनच्या भारतीय अंकात श्रद्धाची वर्णी लागल्याने तिच्या ग्लॅमर कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘हाफ गर्लफ्रेंड’  या चित्रपटाचे  कथानक प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकावर आधारलेले असून या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर एका सर्वसामान्य बिहारी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो दिल्लीच्या एका श्रीमंत तरुणी आलियाच्या (श्रद्धा कपूर ) प्रेमात पडतो.