Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dark Fantasy : ​ राधिका आपटेचे हॉट फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 10:32 IST

बोल्ड लूक आणि हॉट अंदाज यामुळे सदा चर्चेत राहणारी अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा चर्चेत आहे. होय,लेटेस्ट फोटोशूटमुळे ती पुन्हा ...

बोल्ड लूक आणि हॉट अंदाज यामुळे सदा चर्चेत राहणारी अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा चर्चेत आहे. होय,लेटेस्ट फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोशूटमधील राधिकाचा डस्टी लूक पाहण्यासारखा आहे.हे फोटोशूट गौरव गुप्ता याने केले आहे. हे फोटोशूट राधिका आपटेच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे. आपल्या जिवंत अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणाºया राधिका आपटेने काही दिवसांपूर्वी असेच एक हॉट फोटोशूट केले होते. यात ती सेमी न्यूड लूकमध्ये दिसली होती.राधिकाच्या ‘पार्च्ड’मधील भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. यातील राधिकाचा अभिनयही प्रशंसनीय होता. काही दिवसांपूर्वी राधिका ‘कबाली’मध्ये दिसली होती. लवकरच ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षयसोबतच राधिकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगानंदम यांचा बायोपिक आहे.  अरुणाचलम मुरुगानंदम  यांनी स्त्रियांसाठी विशेषत: खेड्यातील स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स (पॅड) तयार केले आणि त्यानिमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला.गत फेबु्रवारीत दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने न्युडिटीवर अगदी बिनधास्त मत मांडले होते. ‘पार्च्ड’ सिनेमात तिच्या न्यूड सीन्सवरून बरीच कॉन्टोवर्सी झाली होती. या देशात सेक्स, लैंगिकता या विषयांवर बोलणं एक लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे कोणत्याशी शारीरिक किंवा लैंगिक गोष्टीविषयी बोलणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. पण चित्रपटाच्या कथेची गरज असेल तर न्युडिटी मला मान्य आहे. अशास्थितीत त्याला विरोध असण्याचे काहीही कारण नाही, असे राधिका म्हणाली होती.चित्रपटांतील लव्ह मेकिंग सीन्सलाही तिचा विरोध नाही.