Dangal Screening at PVR Icon in Mumbai
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:59 IST
आमिरच्या दंगलाच्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटासाठी आमिर आणि दंगलच्या टीमने चांगलीच मेहनत घेतली आहे. रिलीज पूर्वी आमिर महावीर सिंग फोगट, सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यासाठी याचित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले होते आणि यासर्वांंना हा चित्रपट पसंत पडला होता.
Dangal Screening at PVR Icon in Mumbai
आमिरच्या दंगलाच्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटासाठी आमिर आणि दंगलच्या टीमने चांगलीच मेहनत घेतली आहे. रिलीज पूर्वी आमिर महावीर सिंग फोगट, सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यासाठी याचित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले होते आणि यासर्वांंना हा चित्रपट पसंत पडला होता. स्क्रीनिंगला येणाऱ्या कलाकारांचे आमिर आणि किरण दोघेही स्वागत करत होते. आमिरसह चित्रपटताल्या त्याच्या दोनही मुली. फातीमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या दोघीनींही यावेळी ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. सनी लिओनी पती डॅनिअलसह अवतरली, यामी गौतम वनपीसमध्ये हॉट दिसत होती. विद्या बालनही दंगलच्या स्क्रीनिंगला हजर होती. रोनित रॉय पत्नी नीलिम सिंगही उपस्थित होता. रमेश शेट्टी आणि पत्नी किरण शेट्टीही याठिकाणी उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र याठिकाणी आपल्या हटके अंदाजात एंट्री घेतली. अभिनेत्री रेखा यानी हटके अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले. अभिनेत्री जुही चावल यावेळी रेड कलरच्या ड्रेसमध्ये खूपच गॉर्जिअस दिसत होती.