Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखला इंडस्ट्रीत कुणी देईना काम ! कारण ठरतोय, आमिर खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 12:12 IST

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख ही सध्या तिच्या कामापेक्षा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, आॅनस्क्रीन पिता आमिर खानसोबतची जवळीक ...

‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख ही सध्या तिच्या कामापेक्षा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, आॅनस्क्रीन पिता आमिर खानसोबतची जवळीक तिला भारी पडताचा दिसतेय. ‘दंगल’नंतर फातिमा आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये दिसणार आहे. पण ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ नंतर काय, हा फातिमासमोरचा प्रश्न आहे. होय, चर्चा खरी मानाल तर आमिरसोबतच्या जवळीकीमुळे इंडस्ट्रीतील लोक फातिमाला काम देताना कचरत आहेत. काम मिळावे म्हणून फातिमा अनेक प्रॉडक्शन हाऊसशी संपर्क केला. पण तू आमिर खानची प्रॉडक्ट आहेस, तोच तुला काम देईल, असे सांगत अनेक प्रॉडक्शन हाऊसने तिला म्हणे काम देण्यास नकार दिला. ‘दंगल’मध्ये फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटानंतर आमिरच्या पुण्याईने फातिमाला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मिळाला. आमिरनेच यशराज फिल्म्सकडे फातिमाची शिफारस केली होती. यास्रदरम्यान ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ मध्ये फातिमाला कास्ट केल्यामुळे आमिरची पत्नी किरण राव नाराज असल्याची बातमीही  आली होती. त्याआधी तर फातिमा व आमिरबद्दल वेगळीच चर्चा रंगली होती.  आमिर व फातिमाच्या वाढत्या जवळीकीच्या बातम्या दबक्या आवाजात सुरु होत्या. दोघेही परस्परांच्या बरेच जवळ आले आहेत आणि हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेलेय, अशी ही चर्चा  होती. या बातम्यांनी किरण राव अस्वस्थ असल्याचेही कानावर आले होते. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे आम्हाला माहित नाही. पण लोक फातिमाला ‘आमिरची प्रॉडक्ट’ म्हणू लागलेत, म्हटल्यावर काही तरी नक्की आहे. आता फातिमा यातून जितक्या लवकर बोध घेईल, तितके चांगले.ALSO READ : WHAT?? आयब्रोजवरून ट्रोल झाली फातिमा सना शेख!!‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आमिर व अमिताभ ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे. आमिरच्या अपोझिट सना शेख आणि कॅटरिना कैफ या दोघी आहेत.  येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.