Join us

राजकुमार रावचा गर्लफ्रेंडसोबत डान्सचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:23 IST

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या चित्रपटांप्रमाणेच नवं वर्षाचे स्वागतपण राजकुमारने वेगळ्या पद्धतीने केले.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या चित्रपटांप्रमाणेच नवं वर्षाचे स्वागतपण राजकुमारने वेगळ्या पद्धतीने केले. नव वर्षाचे स्वागत राजकुमारे आपली गर्लफ्रेंड पत्रलेखा सोबत नाचतं गातं केले. राजकुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो पत्रलेखासोबत अमिताभ बच्चन यांचे फेमस गाणं जुम्मा चुम्मा डान्स करताना दिसतो आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे. या गाण्यातील स्टेप पण दोघे सुंदर पद्धतीने करताना दिसतायेत. दोघे एक जवळाच्या मैत्रिच्या लग्नात बँकॉकला गेले आहेत. या लग्न दरम्यानचा हा व्हिडिओ आहे.  राजुकमार राव आणि पत्रलेखा हे दोघे 2014 मध्ये सिटीलाइट्स चित्रपटात एकत्र दिसले होते. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. नेहमीच दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. राजकुमार राव आणि पत्रलेखा आपल्या रिलेशनशीपला घेऊन खूप सीरियस आहेत. दोघे नेहमीच मीडियासमोर आले रिलेशनबाबत बोलताना दिसतात. राजकुमार नेहमीच आपल्या चित्रपटातील यशाचे श्रेय पत्रलेखाला देताना दिसतो. 2017मध्ये राजकुमार न्यूटन, बरेली की बर्फी सारख्या हिट चित्रपटात दिसला होता. राजकुमारच्या न्यूटन चित्रपटाला   सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागात नामांकन मिळाले होते. या चित्रपटात देशातील राजकारणावर उपरोधिक भाष्य करण्यात आलेय. नूतन कुमार (राजकुमार राव) हा दहावी बोर्डाच्या परीक्षेवेळी आपले नाव न्यूटन असे लिहितो आणि पुढे त्याच नावाने ओळखला जातो. त्यानंतर, त्याला नक्षलग्रस्त भागात निवडणूक अधिकारी म्हणून जावे लागते. लोकनाथ (रघुवीर यादव), मालको (अंजली पाटील), पोलीस अधिकारी आत्मा सिंह (पंकज त्रिपाठी) ही टीम घेऊन तो जंगलात जातो. तिथे गेल्यावर  गावात फक्त ७५ मतदार असल्याचे त्याला कळते. पण मतदानाच्या दिवशी कुणीच येत नाही. पण नंतर सगळे चित्रचं पालटते आणि वेगळाच निकाल समोर येतो, असे या चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटातील राजकुमारच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.